आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी यांचे निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'गांधी', 'दिल', 'अजुबा' यांसह अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये अविस्मरणीय भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इंटरनॅशनल बिझनेस टाइम्सच्या वृत्तानुसार, त्यांच्या निधनाचे वृत्त त्यांची भाची शाहिन अग्रवाल यांनी फेसबुकच्या माध्यमातून दिले आहे. शाहिन अग्रवाल यांनी पोस्ट केले, "आज जाफरींची एक पीढी संपली. सईज जाफरी आपल्या वडील आणि बहीण-भावंडांना जाऊन भेटले."
जाफरी यांनी हिंदीसोबतच अनेक ब्रिटिश सिनेमांमध्ये अभिनय केला. 'गांधी'(1982), 'हिना'(1991) या सिनेमांमधील भूमिकांसाठी जाफरी यांना ओळखले जाते. राजकपूर यांच्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केले होते. अभिनेत्री आणि ट्रॅव्हल रायटर मेहरुनिमा (मधुर जाफरी) यांच्यासोबच त्यांचे लग्न झाले होते. मात्र 1965 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना तीन मुली असून मीरा, जिआ आणि सकीन जाफरी ही त्यांची नावे आहेत.
बातम्या आणखी आहेत...