आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Sanjay Dutt Finally Walks Free From The Yerwada Jail, Reaches Mumbai

#SanjayDutt: मान्यताचा खुलासा, \'मुलांना ठाऊकच नाही, की त्यांचे पापा घरी येत आहेत\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः संजय दत्त गुरुवारी सकाळी साडे आठच्या सुमारास तुरुंगातून बाहेर पडला. बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याप्रकरणी संजयला पाच वर्षांची शिक्षा झाली होती. पत्नी मान्यता दत्त आणि दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी संजयला तुरुंगाबाहेर रिसीव्ह केले. मान्यताने सांगितले, त्यांनी दोन्ही मुले शाहरान आणि इकरा यांनी त्यांचे पापा घरी परतत असल्याचे ठाऊकच नाहीये. आम्ही दोघांनाही सरप्राईज देणार आहोत.
विमानतळावरुन थेट जाणार सिद्धिविनायक मंदिरात..
-dainikbhaskar.com सोबत बातचित करताना मान्यताशी निगडीत एका सूत्राने सांगितले, "मानाने संजयच्यावतीन काही गिफ्ट्स मुलांसाठी खरेदी करुन ठेवले आहेत."
- मुलांना भेटल्यानंतर संजय हे गिफ्ट्स आपल्या चिमुकल्यांना देणार आहे.
- मुंबईत आल्यानंतर संजय सर्वप्रथम सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाणार आहे.
- त्यानंतर तो मरीन लाइन्स स्टेशनजवळ असलेल्या कब्रस्तानात जाणार आहे. येथे त्याची आई (नर्गिस दत्त) यांची कब्र आहे.
- तेथून घरी पोहोचून वडील सुनील दत्त यांना श्रद्धांजली वाहणार आहे.
- काही दिवसांनी संजय आपल्या कुटुंबीयांसोबत शिर्डीला दर्शनाला जाणार असल्याचेही समजते.
इमोशनल झाली प्रिया दत्त
- भावाच्या सुटकेमुळे त्याची बहीण प्रिया दत्तने सुटकेचा श्वास घेतला असून ती इमोशनलसुद्धआ झाली. दोघांचे फोनवर बोलणे झाले.
- सूत्रांच्या माहितीनुसार, फोनवर संजयने प्रियाला म्हटले, अखेर 22 वर्षांचा वनवास संपला प्रिया... मी बाहेर आलोय आणि पापांना (सुनील दत्त) मिस करतोय. ते जर आज असते, तर खूप आनंदी झाले असते.
- प्रियानंतर ओवेन रॉनकॉन (प्रियाचे पती) सोबत संजयचे बोलणे झाले.
- ओवेनने संजयला म्हटले, आम्ही तुझी वाट बघत आहोत. ये नंतर बोलुयात.
वडिलांना मिस करतेय त्रिशाला
- सूत्रांच्या माहितीनुसार, संजय दत्तची मुलगा त्रिशाला (पहिली पत्नी ऋचा शर्माची मुलगी) वडिलांना भेटण्यासाठी न्यूयॉर्कहून येणार होती. मात्र असे झाले नाही.
- काही दिवसांपूर्वी तिने इंस्टाग्रामवर आपल्या वडिलांच्या आठवणीत एक व्हिडिओ शेअर केला होता.
- बातम्यांनुसार, तुरुंगातून सुटल्यानंतर संजय त्रिशालाला फोन करणारेय.
कधीपासून होता तुरुंगात?
- 1993 च्या ब्लास्टनंतर संजयला एके-47 आणि इतर शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी राकेश मारिया यांनी अटक केली होती.
- संजय दत्तला टाडाच्या कोर्टाने दोषी ठरवले होते. त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
- याप्रकरणी त्याने 18 महिन्यांची शिक्षा आधीच भोगली होती. त्यामुळे त्याला उर्वरित 42 महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
- त्यानंतर 21 मे 2013 पासून तो पुण्याच्या येरवडा तुरुंगात कैद होता.
कोणी लावली होती पिटीशन?
- प्रदीप भालेराव यांनी हायकोर्टात संजय दत्तच्या विरोधात पिटीशन लावली होती.
- संजय दत्तची सुटका होऊ नये, यासाठी त्यांनी हायकोर्टाला पत्र लिहिले होते.
- मुंबई हायकोर्टात संजयच्या सुटकेविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे.
घरी होणार वेलकम पार्टी?
- संजयच्या सुटकेच्या आनंदात सेलिब्रेशन होणारेय.
- सूत्रांच्या मते, त्याचे खास मित्र अजय देवगण, अपूर्व लाखिया, राजकुमार हिराणी, विधू विनोद चोप्रा, बंटी वालिया आणि रजत रवैल संजयच्या पाली हिल स्थित घरी उपस्थित राहणार आहेत.
- सलमान खानसुद्धा संजयच्या स्वागतासाठी जाणार असल्याचे समजते.
- संजय दत्तला चिकन तंदुरी पसंत आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ही खास डिश तयार केली जाणार आहे.
तुरुंगात रेडियो शोच्या रेकॉर्डिंगमध्ये संजय झाला भावूक
- संजयने बुधवारी दुपारी आपला शेवटचा रेडिओ शो रेकॉर्ड केला.
- तो तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर 25 फेब्रुवारीला हा शो कारागृहात प्रसारित करण्यात येणार आहे.
- संजयसोबत शेवटच्या दिवशी झालेल्या अनौपचारिक गप्पांच्या कार्यक्रमामध्ये संजयच नाही, तर त्याच्याशी ऋणानुबंध जुळलेले काही कैदीही थोडे भावूक झाले होते आणि मग कार्यक्रम आटोपता घेताना मुन्नाभाईने त्याची पेटंट ‘जादू की झप्पी’ सगळ्यांना दिली.
- संजय दत्तने कैद्यांना दरवर्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलनात येत जाईन, असेही आश्वासन दिले आहे.
संजयने काय दिला लास्ट मेसेज...
- “गुड आफ्टरनून भाई लोग, आप जब तक कनेक्ट होंगे, तब तक तुम लोगों के लिये यह लास्ट मेसेज छोड के मैं जा चुका रहूँगा।..
- खुश रहना.. साथ रहना.. जुर्म करके किसीका भी भला नहीं हुआ.. सच्चाई के राह पर चलना भाई लोग”
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, तुरुंगाबाहेर पडतानाची संजयची छायाचित्रे...