आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Sanjay Dutt To Be Released From Jail On February 25

गुरुवारी तुरुंगाबाहेर पडतोय संजूबाबा, बाहेर पडताना मिळणार 440 रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता संजय दत्तच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चाहत्यांचा लाडका संजू बाबा पुन्हा एकदा अपनी मर्जी का मालिक होणारेय. अर्थातच संजू बाबा आता कायमचा तुरुंगाबाहेर पडतोय. येत्या गुरुवारी म्हणजे 25 फेब्रुवारी हा दिवस संजय दत्तसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. संजय दत्तच्या सुटकेची तयारी पूर्ण झाल्याचे सुत्रांकडून समजते.
1993च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात झालेली शिक्षा संपवून संजय आता कायमचा बाहेर येणारेय. सध्या संजय दत्त येरवडा कारागृहात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगतोय. सुप्रीम कोर्टाने संजयला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यापैकी 18 महिन्यांचा तुरुंगवास त्याने आधीच भोगला असल्याने उर्वरित साडेतीन वर्षांची शिक्षा पूर्ण करण्यासाठी 21 मे 2013 पासून तो येरवडा तुरुंगात आहे, मात्र आता पावणेतीन वर्षांच्या शिक्षेनंतरच त्याच्यासाठी तुरुंगाची दारे उघडणार आहेत.
कारागृह नियमावलीनुसार, मिळणा-या सुट्या आणि चांगल्या वर्तणुकीमुळे माफ होणारी शिक्षा याचा फायदा संजय दत्तला झाला असून शिक्षा पूर्ण व्हायच्या 114 दिवसांच्या आधीच तो मुक्त होतोय.
पुढे वाचा, कसा असतो संजयचा तुरुंगातील दिवसक्रम
पुढे वाचा, येरवडा तुरुंगामध्ये संजय दत्तचा 'आप की फरमाइश'
पुढे वाचा, संजयला तरुंगातून बाहेर पडताना मिळणार 440 रुपये
पुढे वाचा, चिकन संजूबाबा' फ्री...