आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Superstar Shahrukh Khans Special Karnataka Sheep For Bakrid

शाहरुख खान आहे कर्नाटकच्या बोकडांचा फॅन, कुर्बानीसाठी बंगळुरुहून करतो खरेदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मीट व्यवसायाचा दावा- शाहरुख 3 वर्षांपासून बंगळुरुमधून मागवतो बोकड)
बंगळुरु- बकरी ईद (ईद-उल-अजहा)ला बोकडांची कुर्बानी देण्यासाठी लोकांची मार्केटमध्ये गर्दी वाढली आहे. अशात बॉलिवूड स्टार्स बरे कसे मागे राहू शकतील. बॉलवूड सुपरस्टार शाहरुख खाननेसुध्दा 25 सप्टेंबरला कर्नाटकमधून दोन स्पेशल बोकड खरेदी केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार किंग खानचे खास दक्कनी बोकड बंगळुरुहून विमानाने मुंबईला पोहोचले आहेत. या बोकडांची किंमत 1.10 लाख असल्याचे सांगितले जात आहे. एकूणच दोन्ही बोकडांचे वजन 250 किलोग्राम आहे. बंगळुरुच्या एका मीट व्यावसायिकाने किंग खानसाठी या बोकडाना स्पेशल डाएट देऊन तयार केले आहे.
कर्नाटकमध्ये मिळतात दक्कनी बोकड-
मीट व्यावसायिक मोहम्मद इब्राहिमने सांगितले, की ते मागील 3 वर्षांपासून शाहरुख आणि बंगळुरुमध्ये राहणा-या त्यांच्या नातेवाईकांसाठी बोकड पाठवत आहेत. यावेळी किंग खानसाठी मीट व्यावसायिकांनी 95 हजार रुपयांत 2 बोकड खरेदी केले आहेत. त्यांनी सांगितले, की शाहरुखला दक्कनी बोकड आवडतात. तो कर्नाटकच्या गावांत दक्कनी प्रजातीच्या बोकड शोधतो. बंगालकोट जिल्ह्यात या प्रजातीचे बोकड सर्वाधिक आढळतात. सेलिब्रिटीसाठी बंगालकोट जिल्ह्यातून बोकड आणले जातात.
शाहरुखला बोकड पाठवणे भाग्य-
इब्राहिम सांगतात, बॉलिवूडच्या सुपरस्टारसाठी बोकड पाठवणे माझ्यासाठी भाग्य आहे. शाहरुखसाठी खास दक्कनी बोकडांचा नेहमी शोधत असतो आणि त्यांच्या डाएटचीसुध्दा पूर्ण काळजी घेतो. बोकडांना दूध, अंडे आणि न्यूट्रीएंट्स दिले जाते. जेणेकरून ते मजबूत आणि चांगले दिसावेत. बंगळुरुमध्ये या बोकडांची किंमत 35-45 हजार आहे.
शाहरुखच्या बोकडांचे वैशिष्ट-
किंमत- 1.10 लाख
वजन- 250 किलोग्राम
प्रजाती- दक्कनी बोकड
बोकडांचे डाएट- दूध, अंडे आणि न्यूट्रीएंट्स
कुठे भेटतात- कर्नाटकच्या बंगालकोटमध्ये
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शाहरुखच्या बोकडांचा फोटो...