आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंगदरम्यान शक्ती कपूर झाले जखमी, सामानसुध्दा गेले चोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- शक्ती कपूर)
मुंबई- अभिनेता शक्ती कपूर यांना सिनेमाच्या शूटिंगदरम्यान चाहत्यांच्या रागाचा सामना करावा लागला आणि ते जखमी झाले. एवढेच नव्हे, चाहत्यांनी त्यांचे सामानसुध्दा चोरले.
शक्ती कपूर कानपूरच्या 'क्या कूल है हम' सिनेमाच्या तिस-या पार्टचे शूटिंग करत होते.
त्यांच्यासोबत अभिनेता तुषार कपूर आणि आफताब शिवदासानीसुध्दा होते. या स्टार्सना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली. शूटिंगदरम्यान चाहत्यांना स्टार्सना भेटण्याची परवानगी नव्हती. परंतु शक्ती कपूर त्यांना भेटायला गेले असता, चाहते त्यांच्यावर तुटून पडले. शक्ती कपूर जखमी झाले.
घटनेनंतर लगेच त्यांच्यावर उपचार करण्यासाठी जवळच्या क्लिनिकमध्ये नेण्यात आले. घटनेनंतर शक्ती कपूर यांनी सांगितले, की चाहत्यांनी त्यांचे सामानसुध्दा चोरले.