मुंबईः हिंदी सिनेसृष्टीत
आपल्या विनोदी आणि व्हिलनच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते शक्ती कपूर यांनी वयाची ५८ वर्षे पूर्ण केली आहेत. ३ सप्टेंबर १९५८ रोजी जन्मलेल्या शक्ती कपूर यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये ७५० हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी divyamarathi.com सोबत आपल्या आयुष्याशी निगडीत अनेक खास गोष्टी शेअर केल्या आहेत...
वाढदिवसाचे सेलिब्रेशन कसं होतं?
- यंदा मी वाढदिवसाला भूवनेश्वर येथे एका ओडिया सिनेमाचे शूटिंग करत आहे. माझ्या कुटुंबीयांचे मत आहे, की जर वाढदिवशी काम असेल, तर ते पहिले करायला हवे.
बालपणीच्या काही खास आठवणी शेअर करा?
- माझी आई वाढदिवसाच्या निमित्ताने कधी क्रिकेटची बॅट द्यायची तर कधी सोन्याची साखळी. मोठे झाल्यानंतर मला वेगवेगळे लॉकेट खूप आवडू लागले. तर आई माझ्यासाठी लॉकेट आणायची. शंकराचे लॉकेट आईने मला दिले होते. तर वडील नवीन कपडे घेऊन द्यायचे.
एखादे स्पेशल गिफ्ट आठवतंय का?
- मला आठवतंय एका चेन्नईत मी शूटिंग करत होतो आणि मी मुंबईत का नाही, म्हणून माझी पत्नी रागावली होती. त्यावेळी श्रद्धा ६ वर्षांची असेल. मी ३ सप्टेंबरच्या सकाळी सकाळी दिग्दर्शक रघुवेंद्र साहेबांची परवानगी घेऊन मुंबईची फ्लाइट पकडली आणि घरी पोहोचलो तर पत्नी घरी नव्हती. श्रद्धा आपल्या खोलीत बसली होती. तिने मला बघून मला बर्थडे विश केले आणि आई घरी नसल्याचे सांगितले. आई रात्री येणार म्हणून तिने मला सांगितले. मला वाटलं, माझं सरप्राइज बेकार झालं. मग श्रद्धा माझा हात पकडून मला हॉलमध्ये घेऊन आली. पिआनोवर हॅपी बर्थडे गाणे वाजवले आणि गायलेसुद्धा. तिचे गाणे ऐकून माझ्या डोळ्यांत अश्रू तरळले. तो दिवस मी कधीच विसरु शकत नाही.
श्रद्धा बालपणापासूनच पिआनो वाजवते का?
होय. श्रद्धा खूप छान पिआनो वाजवते. आगामी 'रॉन ऑन २' या सिनेमात ती पिआनो वाजवणार आहे. सोबतच ती गातेसुद्धाय मात्र तिने यासाठी विशेष काही ट्रेनिंग घेतलेले नाही.
पुढील स्लाईड्सवर वाचा, आणखी काय सांगितले शक्ती कपूर यांनी...