आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांच्या निधनामुळे सोनूच्या अश्रूंचा फुटला बांध, 8 वर्षांपूर्वीच आईचेही झाले होते निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनूचे सांत्वन करताना त्याचे मित्र. - Divya Marathi
सोनूचे सांत्वन करताना त्याचे मित्र.
मुंबईः अभिनेता सोनू सूदचे वडील शक्ती सूद यांचे रविवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. 77 वर्षीय शक्ती सूद हे गेल्या चार वर्षांपासून श्वासोच्छवासाचा त्रास होता. सोनूने दिलेल्या माहितीनुसार, शेवटच्या क्षणी त्याचे वडील त्याच्यासोबत गप्पा मारत होते. मात्र अचानक ते बेडवरुन खाली कोसळले. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या दोन मुली आल्यानंतर मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सोनूच्या दोन बहिणी मालविका आणि मोनिका आहेत. एक पंजाबमध्ये तर दुसरी बहीण परदेशात वास्तव्याला आहे.
वडिलांच्या छत्र हरपल्याने शोकाकूल झाला सोनू
वडिलांच्या निधनामुळे सोनूच्या अश्रुंचा बांधच फुटला. सोनू म्हणाला, आता मी अनाथ झालोय. माझ्या डोक्यावरुन वडिलांचे छत्र हरपले आहे.
आठ वर्षांपूर्वीच झाले होते आईचे निधन
सोनूचे वडील मोगा, पंजाबमध्ये राहायचे. सोनूची आई सरोज सूद या शिक्षिका होत्या. आठ वर्षांपूर्वीच त्यांचेही निधन झाले होते.
पुढे पाहा, संबंधित छायाचित्रे...