आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Actor Vinod Khanna Dies At Age 70, Took Last Breath In Mumbai HN Reliance Foundation Hospital

विनोद खन्ना यांचे निधन; मुलाखत अर्ध्यावर सोडून हॉस्पिटलमध्ये पोहोचले अमिताभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘अमर अकबर अँथनी’ त्रिकूटातील ‘अमर’ म्हणजेच अभिनेते विनोद खन्ना आता आपल्यात नाहीत. गुरुवारी प्रदीर्घ आजारामुळे त्यांचे निधन झाले. विनोद खन्ना यांचे जवळचे मित्र आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांना त्यांच्या निधनाची बातमी एका कार्यक्रमात कळली. राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘सरकार 3’ या सिनेमाच्या निमित्ताने अमिताभ बच्चन पत्रकारांना मुलाखत देत होते. याच ठिकाणी त्यांना विनोद खन्ना यांच्या निधनाचे वृत्त समजले. विनोद यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी अमिताभ यांनी ही मुलाखत अर्ध्यावर सोडली. विनोद खन्ना यांचे बिग बी यांच्यासोबतचे सिनेमे विशेष गाजले. त्यापैकीच काही सिनेमे म्हणजे ‘हेराफेरी’ (1976), ‘खून पसिना’ (1977), ‘अमर अकबर अँथनी’ (1977), ‘परवरिश’ (1977) आणि ‘मुकद्दर का सिकंदर’ (1978). 
 
पेशावरमध्ये झाला होता जन्म...
विनोद खन्ना यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1946 साली झाला. त्यांचे वडिल व्यापारी होते. भारत-पाक विभाजनानंतर ते पेशावर येथून मुंबईत आले. त्यांच्या आईचे नाव कमला, वडिलांचे नाव किशनचंद होते. 1960 नंतर त्यांनी नाशिक येथील बोर्डींग स्कुलमध्ये झाली आणि सिद्धेहम कॉलेजमधून त्यांनी कॉमर्समधून पदवी घेतली.
 
वडिलांनी दाखवला होता बंदूकीचा धाक 
विनोद खन्ना यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की एका पार्टीदरम्यान त्यांची भेट सुनील दत्त यांच्याशी झाली. ते एका सिनेमात आपल्या भावाच्या भूमिकेसाठी नवीन चेह-याच्या शोधात होते. त्यांनी विनोद खन्ना यांना ती भूमिका ऑफर केली. मात्र याविषयी जेव्हा विनोद यांच्या वडिलांना माहित झाले तेव्हा त्यांनी विनोद यांना बंदूकीचा धाक दाखवला. त्यांनी सांगितले, की तू सिनेमात काम केलेस मी तुला गोळी मारेल. मात्र विनोद यांच्या आईने वडिलांना समजावले आणि दोन वर्षांची मुदत दिली. वडिलांनी सांगितले, की दोन वर्षांत काहीच करू शकला नाही तर फॅमिली बिझनेस सांभाळायचा.
 
बातम्या आणखी आहेत...