आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान-करीनासोबत झळकलेल्या या अभिनेत्रीला झाली दोन वर्षे कारावासाची शिक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री अलका कौशल यांना पंजाबच्या संगरुर न्यायालयाने दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ‘स्वरागिनी’ आणि ‘कुबूल है’ या मालिकांमध्ये अलका कौशल झळकल्या आहेत. 

काय आहे प्रकरण... 
अलका कौशल आणि त्यांच्या आईने अवतार सिंग नावाच्या व्यक्तीकडून 50 लाख रुपये घेतले होते. मालिकेच्या निर्मितीचे कारण देत हे पैसे त्यांनी घेतले होते. ज्यावेळी अवतार सिंग यांनी त्यांचे पैसे परत मागितले, तेव्हा त्यांना 25 -25 लाखांचे दोन धनादेश देण्यात आले. पण, त्यांना देण्यात आलेले हे दोन्ही धनादेश बाउन्स झाले. या सर्व प्रकारानंतर अवतार सिंग यांनी अलका आणि त्यांच्या आईविरोधात मलेरकोटला येथे गुन्हा दाखल केला. 2015 मध्येच अलका आणि त्यांच्या आईला कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण, त्यांनी या निर्णयाविरोधात संगरुर न्यायालयात याचिका दाखल केली. या अपीलाच्या माध्यमातून, आम्ही अवतारकडून पैसे घेतलेच नसल्याचे अलका आणि त्यांच्या आईचे म्हणणे होते. पण, याविषयीचा सखोल तपास करण्यात आल्यानंतर, अलका आणि त्यांच्या आईला या सर्व प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं असून, दिलेल्या शिक्षेचा आदेश कायम ठेवला आहे. पोलीस तपास आणि हाती आलेल्या सर्व पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने अलका आणि त्यांच्या आईला दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 

सलमान-करीनासोबत केलंय काम... 
अलका कौशल हे टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी आजवर बऱ्याच मालिका आणि सिनेमांमधून भूमिका साकारल्या आहेत. सलमान खान आणि करीना कपूर यांच्या भूमिका असणाऱ्या ‘बजरंगी भाईजान’ या सिनेमात त्यांनी करीनाच्या आईची भूमिका साकारली होती. कंगना रनोटची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘क्वीन’ या सिनेमातही त्यांनी काम केले होते.

पुढील स्लाईड्सवर बघा, अलका कौशल यांची निवडक छायाचित्रे... 
बातम्या आणखी आहेत...