आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृतिकाच्या पार्थिवावर आढळल्या अनेक जखमा, एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक करणार तपास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अॅक्ट्रेस कृतिका चौधरीच्या (24) मृत्यूप्रकरणी अंबोली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कृतिकाची हत्या पाच बोटात घातल्या जाणाऱ्या धारदार पंजाद्वारे करण्‍यात आली आहे. हत्येसाठी वापरलेले शस्त्रही जप्त केले आहे. कृतिकाच्या मृतदेहावर अनेक जखमा आढळून आल्या आहेत. त्यावरून हे स्पष्ट झाले आहे की, हत्येपूर्वी तिला बेदम मारहाण करण्यात आली होती. 

पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात.. 
- सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि चौकशीनंतर पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. दोघांची चौकशी सुरू आहे. मात्र ताब्यात घेतलेल्या दोघांनी नेमके काय केले होते, हे अद्याप समोर आलेले नाही. 
- दुसरीकडे हत्येचा हा गुंता सोडवण्याची जबाबदारी मुंबई पोलिसांनी प्रसिद्ध अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायकला सोपवली आहे. 
- एसपी अरुण चव्हाण यांच्या मते प्रकरणाची चौकशी करणाऱ्या टीमकडे अनेक लीड्स आहेत आणि त्याआधारेच तपास सुरू आहे. 
- अनेकांची चौकशी केली असून इतरही अनेकांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. 
- पोलिस आधी आकस्मिक मृत्यूचे प्रकरण दाखल करणार होते, पण आता लवकरच या खुनाचे संपूर्ण प्रकरण उघड होणार आहे. 

सोमवारी आढळला होता मृतदेह 
- कृतिका चौधरीचा मृतदेह सोमवारी मुंबईच्या अंधेरीमधील चार बंग्लो परिसरातील भैरवनाथ SRA बिल्डींगमध्ये आढळला होता. 
- त्यावेळी पोलिसांनी शंका व्यक्त केली होती की, तिचा मृत्यू अंदाजे चार दिवसांपूर्वी झालेला असू शकतो. 
- समोर येत असलेल्या माहितीनुसार ती घरात एकटी राहायची. सोमवारी सायंकाळी अचानक फ्लॅटमधून दुर्गंध येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली होती. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, कृतिकाच्या हत्येविषयी इतर संबंधित माहिती..
बातम्या आणखी आहेत...