आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bday: भगवान दादांमुळे या अभिनेत्रीला गमवावा लागला डोळा, आयुष्यभर केल्या चरित्र भूमिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  खलनायिका अभिनेत्री म्हणून अनेक वर्षे गाजवलेली अभिनेत्री म्हटले की ललिता पवार यांचा चेहरा डोळ्यापुढे येतो. 18 एप्रिल 1916 साली जन्मलेल्या ललिता पवार यांचे आयुष्यही नाट्यमयच होते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊ त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी...
 
मराठी चित्रपटांपासून केली कारकिर्दीची सुरुवात
 
ललिता पवार जरी हिंदी चित्रपटातील आईच्या आणि खलनायिकेच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध होत्या, त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात मराठी चित्रपटांतून केली होती. त्यांनी नेताजी पालकर, संत दामाजी, अमृत, गोरा कुंभार यांसारख्या मराठी चित्रपटातून प्रसिद्धी मिळविली. दूरदर्शनच्या रामायण मालिकेमधील मंथरेची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, तब्बल 70 वर्षे दिले चित्रपटसृष्टीला...
बातम्या आणखी आहेत...