Home »News» Actress Madhubala Wax Statue Madame Tussauds In Delhi

मादाम तुसादमध्ये अवतरली बॉलिवूडची 'अनारकली', पुतळ्याचे सौंदर्य पाहून व्हाल अवाक्

दिव्य मराठी वेब टीम | Aug 11, 2017, 17:26 PM IST

नवी दिल्ली - आरस्पानी सौंदर्याने सर्वांनाच मोहिनी घालणारी अभिनेत्री कोण असे विचारल्यावर ओठांवर आपसुकच नाव येते ते मधुबालाचे. कमी वयातच जगाला अलविदा करत आपल्यातून निघूनल गेलेल्या मधुबालाला आजही तितकेच सजीवपणे बघण्याची इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे. मधुबालाचा मेणाचा पुतळा दिल्ली येथे मादाम तुसाद म्युझियममध्ये उभारण्यात आला आहे. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा हिंदी क्लासिक काळातील कोण्या अभिनेत्रीचा पुतळा मादाम तुसादमध्ये ठेवण्यात आला आहे. वहीमर्लिन इंटरटेनमेंट इंडिया प्राइवेट लिमिटेडचे निर्देशक अंशुल जैनयांनी सांगितले की, वर्षाच्या अखेरपर्यंत दिल्लीतील लोक मधुबालासोबत सेल्फी घेऊ शकणार आहेत.
मधुबालाचा मेणाचा पुतळा तिच्या गाजलेल्या मुगल-ए-आझम चित्रपटातील अनारकलीच्या रुपातला आहे. मेणाच्या पुतळ्यातही मधुबालाचे सौंदर्य डोळे दिपवणारे आहे.
पुतळ्याला लावले आहे खरेखुरे केस..
मधुबालाचे सौंदर्य प्रत्यक्षरुपात उतरवण्यासाठी कलाकारांनी फार रिसर्च केला. मधुबालाच्या नातेवाईकांना भेटून त्यांनी ही सर्व माहिती मिळवली. मधुबालाचे अनेक फोटो आणि व्हिडिओचा त्यांनी अभ्यास केला. मधुबालाच्या जुन्या कपड्यांचा आधार घेऊन त्यांनी त्यांच्या फिगरबद्दल माहिती घेतली. हे सर्व करत पुतळा बनायला सहा महिन्यांचा वेळ लागला.
छोटी बहीण मधूर भूषणने केले पुतळ्याचे अनावरण
मधुबाला यांची लहान बहीण मधुर भूषण यांनी सांगितले की, मधुबाला मुगल-ए-आझम चित्रपटासाठी फारच उत्साहात होती पण कोणी विचार केला होता जेव्हा हा चित्रपट रिलीज होईल तेव्हा मधुबाला या जगात नसेल. मधुबाला इतकी सुंदर होती की त्यांना कधीही मेकअपची गरज नसे. सफेद कपड्यांमध्ये मधुबाला जणू काही संगमरवराची मुर्तीच वाटत असे, असे त्यांनी सांगितले.
पुढच्या स्लाईडवर पाहा, मादाम तुसादमधील मधुबालाच्या मेणाच्या पुतळ्याचे काही PHOTOS..

Next Article

Recommended