आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mallika Reveals The Reason Why She Is Not Doing Aamir Khan's Dangal

मल्लिका म्हणाली, 'कोणत्याच अँगलने 4 मुलींची आई दिसत नाही, म्हणून सोडला 'दंगल'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मल्लिका शेरावत)
मुंबई- अभिनेत्री मल्लिका शेरावतने मुंबई स्थित रंजीत स्टुडिओमध्ये गणपती बाप्पाची पूजा केली. साडीमध्ये आलेली मल्लिकाने मीडियासोबत खास बातचीत केली. यावेळी मल्लिका आमिर खानचा 'दंगल' सिनेमा न करण्याचे कारण सांगितले आहे.
आमिर खानच्या 'दंगल' सिनेमात त्याच्या पत्नीचे पात्र साकारण्यासाठी मल्लिकाने ऑडिशन दिले होते. मात्र नंतर हा सिनेमा साक्षी तंवरला मिळाला. मीडियासोबत बातचीत करताना मल्लिकाने सिनेमा न करण्याचे कारण सांगितले. मल्लिका म्हणाली, 'मी दंगलमध्ये आमिर खानच्या पत्नीच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते. पूर्ण टीमला माझे ऑडिशन आवडले होते. मात्र पत्नीची भूमिका चार तरुण मुलींच्या आईची आहे. मात्र टीमने मला स्पष्ट सांगितले, की काही केले तरी तू चार मुलींची आई दिसू शकत नाही. त्यामुळे माझ्या हातून हा सिनेमा गेला.'
मल्लिकाने स्वीकार केले, की ती बुरखा परिधान करून फिरते. तिच्या सांगण्यानुसार, की तिला अनवॉन्टेंड अटेन्शन नकोय, म्हणन विनाकारण पब्लिक अटेन्शनपासून दूर राहते. त्यामुळे ती बुरखा घालते. मल्लिकाचा 'डर्टी पॉलिटिक्स' सिनेमा मागील काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. मात्र या सिनेमाला खास प्रतिसाद मिळाला नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या मल्लिकाचे काही फोटो...