आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

46 वर्षांची झाली मनीषा, कधीकाळी या अॅक्टरला करायची डेट!, विवेकने दिला बर्थडे मॅसेज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनीषा कोइराला आणि विवेक मुश्रान. - Divya Marathi
मनीषा कोइराला आणि विवेक मुश्रान.
मुंबई- मनीषा कोइरालाचा आज 46वा जन्मदिवस. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या \'सौदागर\' चित्रपटातील \'इलू इलू\' या गाण्याने तिला खास ओळख मिळवून दिली. तिचा जन्म 16 ऑगस्त, 1970 रोजी काठमांडू येथे झाला. तिने बॉलीवुडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मधल्या काळात ती कॅन्सरने ग्रस्त होती. मात्र तिने त्यावरही मात केली. नेपाळ राजघराण्याशी तिचा फार जवळचा संबंध आहे. तिचे अजोबा विश्वेश्वर प्रसाद कोइराला हे 1950 च्या दशकात नेपाळचे प्रधान होते. मनीषाने 1989 मध्ये नेपाळी चित्रपट \'फेरी भेटौला\' मधून पदार्पण केले. 
कधीकाळी विवेकला डेट करायची मनीषा...
चित्रपटातील पदार्पणानंतर लगेचच दोन वर्षांनी तिने विवेक मुश्रानसोबत \'सौदागर\' चित्रपटात काम केले. या चित्रपटानंतर मनीषाने विवेक फर्स्ट लव्ह लेटर (1991), इंसानियत का देवता (1993) आणि सनम (1997) मध्येही काम केले. रिपोर्ट्सवर विश्वस ठेवला तर मनीषा विवेक मुश्रानला डेट करत होती. मनीषाचा को-स्टार रहिलेल्या विवेक मुश्रानने आमच्याशी बोलतांना तिला स्पेशल मैसेज दीला आहे.
विवेकने सांगितल्यानुसार, मनीषा नेहमीच स्ट्रान्ग आणि डिटर्माइंड पर्सन राहिली आहे. तिने जीवनात आलेल्या प्रत्येक संकटाचा निकराने सामना केला आहे. मी परमेश्वराकडे तिच्या दिर्घायूष्याची आणि निरोगी, निरामय आयुष्याची प्रार्थना करतो.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मनीषाच्या आयुष्याशी संबंधित काही खास Photos...
बातम्या आणखी आहेत...