Home »News» Actress Manisha Koirala Says She Looked Like Alien After Chemotherapy

कँसरनंतर स्वतःला ओळखू शकली नव्हती मनीषा, म्हणाली-एलियन सारखी झाले होते

दिव्य मराठी वेब टीम | Apr 21, 2017, 15:06 PM IST

मनीषा कोयरालाने काही दिवसांपुर्वीच एका इंटरव्यूमध्ये सांगितले की, कँसरच्या उपचारानंतर ती एलियनसारखी दिसत होती. मनीषानुसार, कीमोथेरेपीमुळे तिचे केस गळाले होते. मनीषा दिर्घकाळापासून फिल्मपासून दूर आहे. परंतु संजय दत्तवर येणा-या बायोपिकमध्ये ती संजयची आई नरगिसची भूमिका साकारणार आहे. या फिल्ममध्ये संजय दत्तची भूमिका रणबीर कपूर साकारत आहे. 2012 मध्ये मनीषाला झाला होता ओवेरियन कँसर...


- सौदागर, 1942 : अ लव स्टोरी आणि बॉम्बे सारख्या फिल्ममध्ये काम केलेल्या मनीषाला डिसेंबर, 2012 मध्ये ओवेरियन कँसर झाला होता. यानंतर ती अमेरिकेत गेली आणि जवळपास 6 महिने तिच्यावर उपचार सुरु होते.
- तिला विचारण्यात आले की, कीमोथेरेपी घेतल्यानंतर तुझ्या लुकविषयी चिंतित होती का, तर ती म्हणाली की, मला माहिती होते की, माझे केस गळाले आहे, परंतु लुकविषयी मी श्योर नव्हते.
- मनीषानुसार कँसर सारख्या आजार झाल्यानंतर लुकमध्ये चेंजेस येतात. मला माहिती होते की, कँसरचा सामना करण्यासाठी मला मेंटली तयार व्हावे लागेल आणि यासाठी मला फॅमिलीने पुर्ण सपोर्ट केला.
- कीमोथेरेपीनंतर माझे केस आणि आयब्रो पुर्णपणे गळाल्या होत्या. त्यावेळी मी आरश्यात पाहायचे तर स्वतःला पुर्ण एलियन सारखे फिल करायचे.
- 2 मे, 2013 मध्ये मनीषा कँसरमधून पुर्णपणे चांगली झाली.

सलमान आणि गुलशनने केला सपोर्ट...
मनीषाने सांगितले की, सामान्यतः जेव्हा कोणाला कँसर होतो, तेव्हा प्रायवेसी पर्पजसाठी त्याला एकटे सोडण्यात येते. कारण त्याला स्पेस मिळावा. अशा वेळी मी स्वतःला जगापासून वेगळे केले होते. माझी फॅमिली मला सांगायची की फिल्म इंडस्ट्रीसंबंधीत कोणता व्यक्ती माझ्या तब्येतीविषयी विचारत आहे. मला माहिती आहे की, त्यावेळी सलमान खान आणि गुलशनने माझ्या आजारी आणि त्यामध्ये होणा-या सुधारणेविषयी विचारले होते.


स्वतःला कसे फिट ठेवते मनीषा...
मनीषानुसार, फिटनेससाठी ती रात्री लवकर झोपते आणि सकाळी लवकर उठून सायकल फॉलो करते. मी रात्री 10 वाजता झोपते, सकाळी 4.30 वाजता उठते. सकाळी 7 वाजता माझे योगा गुरु येतात. ज्यांच्याकडून मी मेडिटेशन, प्राणायाम आणि काही आसन शिकते. यानंतर 11 वाजता मी आपले काम करते. डायटविषयी मी खुप स्ट्रिक्ट आहे. मी 99 टक्के व्हेजिटेरियन फूड घेते.


पुढील स्लाईडवर क्लिक कुरन वाचा, लग्नानंतर उद्धवस्त झाले मनीषाचे करियर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended