आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमध्ये लवकरच डेब्यू करणार ही पाकिस्तानी अॅक्ट्रेस, रणबीरनेही केले आहे कौतुक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन)
मुंबईः बॉलिवूडमध्ये नेहमीच पाकिस्तानी कलाकारांना संधी मिळत असते. याच यादीत आता आणखी एका सुंदर पाकिस्तानी अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. मावरा होकेन ही पाक अभिनेत्री लवकरच बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावणार आहे. तिच्या पहिल्या बॉलिवूड सिनेमात हर्षवर्धन राणे तिचा को-स्टार असेल. गेल्या काही दिवसांपासून तिचे मुंबईत येणे-जाणे वाढले आहे. तिच्या मुंबई प्रवासाची छायाचित्रे सोशल मीडियावर बघायला मिळतात. सोशल साइटवरील अलीकडच्या एका फोटोत मावरा रेड चोलीत दिसत आहेत.
एका पाकिस्तानी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत मावराने आपला नवीन लूक, बॉलिवूड एन्ट्री आणि रणबीर कपूरने केलेल्या कौतुकाविषयी सांगितले. मावरा मुंबईत फिल्म इंडस्ट्रीतील काही लोकांना भेटली असून सध्या आपल्या कामावर लक्ष केंद्रीत केल्याचे ती सांगते. डेब्यू सिनेमाचे शूटिंग सुरु झाल्यानंतर त्याचे फोटोज इंस्टाग्राम शेअर करणार असल्याचे मावराने सांगितले.
रणबीर आहे मावराचा फॅन
बॉलिवूडचा रॉकस्टार रणबीर कपूर मावराचा फॅन आहे. रणबीरने या सुंदर अभिनेत्रीच्या अभिनयाचे कौतुक एका व्हिडिओत केले आहे. रणबीरने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता.
पुढील स्लाईडमध्ये वाचा, अभिनेत्री, व्हीजे आणि मॉडेल आहे मावरा होकेन...