आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'Day: प्रेग्नेंसीमध्ये मौसमीने शूट केला होता रेप सीन, ग्लिसरीनशिवाय रडायच्या, जाणून घ्या बरेच काही..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चॅटर्जी आज आपला 69 वा वाढदिवस साजरा करत आहे.मौसमी यांचा जन्म 26 एप्रिल 1948 रोजी कोलकातामध्ये झाला होता.1967 मध्ये बंगाली दिग्दर्शक तरुण मजुमदार यांच्या 'बालिका वधू' या सिनेमाद्वारे त्यांनी आपल्या फिल्मी करिअर ला सुरुवात केली होती. त्यानंतर 1972 मध्ये रिलीज झालेल्या 'अनुराग' या सिनेमाद्वारे मौसमी यांच्या बॉलिवूड करिअरला सुरुवात झाली.'कच्चे धागे', 'जहरीला इंसान','स्वर्ग नरक', 'फूलखिले हैं गुलशन गुलशन', 'मांग भरो सजना', 'दासी', 'अंगूर', 'घर एक मंदिर', 'जल्लाद' हे त्यांचे काही निवडक गाजलेले सिनेमे आहेत.

मौसमी आणि विनोद मेहरा यांच्या जोडीला प्रेक्षकांनी विशेष पसंत केले. याशिवाय जितेंद्र,संजीव कुमार, राजेश खन्ना, शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबतही मौसमी यांनी काम केले. मौसमी यांनी प्रसिद्ध गायक हेमंत कुमार यांचा मुलगा जयंत यांच्यासोबत लग्न केले आहे. मौसमी आपल्या कुटुंबीयांसोबत कोलकातामध्ये राहतात.

मौसमी चॅटर्जी यांच्याविषयी म्हटले जाते की,रडण्याचे दृश्य त्या अगदी सहज करायच्या. यासाठी त्यांना ग्लिसरीनची आवश्यकता भासत नव्हती. याविषयी त्यांना विचारले असता, त्या हसून म्हणाल्या, ''होय हे खरं आहे. हे देवाने दिलेले एक वरदान आहे. जेव्हाही मी रडण्याचे दृश्य करायची, तेव्हा ती घटना आपल्यासोबत प्रत्यक्षात घडतेय असे वाटायचे, त्यामुळे आपोआप डोळ्यात अश्रू तरळायचे.''
 
मौसमी चॅटर्जी याकाळात बंगाली सिनेमांमध्ये काम करत आहे. बॉलिवूडमध्येही काम करण्याची त्यांची इच्छा आहे. यासाठी त्या एका चांगल्या स्क्रिप्टच्या प्रतिक्षेत आहेत.
 
वाचा पुढच्या स्लाईडवर, कसा शूट केला प्रेग्नेंसीमध्ये रेप सीन...
बातम्या आणखी आहेत...