आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिग बॉस'च्या घरात या अॅक्ट्रेसने केला आत्महत्येचा प्रयत्न, समोर आले हे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रियलिटी शो 'बिग बॉस'च्या तमिळ व्हर्जनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या अॅक्ट्रेस ओविया हेलनने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर तिने शो सोडला आहे. रिपोर्ट्सनुसार ओवियाने 'बिग बॉस'च्या घरातील स्विमिंग पूलमध्ये उडी मारली आणि स्वतःला बुडवण्याचा प्रयत्न केला. को-कंटेस्टंट स्नेहनने तिला पाहिले आणि वाचवले. 

यामुळे केला आत्महत्येचा प्रयत्न.. 
रिपोर्ट्सनुसार 6 आठवडे 'बिग बॉस'च्या घरात राहिलेल्या ओवियाला को-कंटेस्टंट आरव आवडू लागला होता. पण आरवने तिच्या अत्यंत जवळ आल्यानंतरही तिचे प्रपोजल नाकारले. त्यामुळेच ओवियाने आत्महत्येचा प्रयत्न केला. 

पोलिस पोहोचले.. 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार ओवियाच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पोलिस बिग बॉसच्या घरात पोहोचले होते. पण मेकर्सनी याबाबत कोणालाही काहीही बोलण्यास मनाई केली होती. 

कमल हसन आहे होस्ट
- 'बिग बॉस' तमिळचा होस्ट कमल हसन आहे. 
- जूनमध्ये सुरू झालेले हे तमिळ भाषेतील पहिले व्हर्जन आहे. हा शो 100 एपिसोड चालवण्याचे प्लानिंग आहे. 

कोण आहे ओविया 
- 26 वर्षांची ओविया तमिळ अॅक्ट्रेस आहे. तिने तमिळ भाषेत 'कलवानी' (2010), 'अगर्थी' (2011), 'मर्निया' (2012), 'पुलिवाल' (2014) आणि '144' (2015) सारख्या चित्रपटांत काम केले आहे. 
- 2015 मध्ये ओवियाने बॉलीवूड चित्रपट 'ये है इश्क सरफिरा' मध्येही काम केले होते. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, बिग बॉसच्या घरातील ओवियाचे 4 फोटोज..
बातम्या आणखी आहेत...