न्यूयॉर्क - प्रियांका चोप्राबरोबर काल रात्री एक अपघात झाल्याचे समोर आले आहे. एफबीआय ड्रामा सिरिज 'क्वांटिको सीजन-2' च्या अॅक्शन पॅक्ड सीनच्या शुटिंगदरम्यान प्रियांका घसरून खाली पडली. त्यामुळे तिच्या डोक्याला जखम झाली. रिपोर्ट्सनुसार प्रियांकाला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी उपचारानंतर तिला सुटीही दिली आहे.
डॉक्टरांच्या देखरेखित..
- प्रियांकाच्या प्रवक्त्यांनी अपघाताच्या घटनेला दुजोरा दिला आहे. शुटिंगदरम्यान सेटवर प्रियांकाबरोबर अपघात झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रियांका वीकेंडनंतर कामावर परतणार असल्याची माहिती मिळाली आहे.
- नुकत्याच कॅलिफॉर्नियात झालेल्या 74व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये प्रियांकाची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती.
एफबीआय एजंट्सवर आधारित
- प्रियांका एबीसी नेटवर्कच्या 'क्वांटिको' सिरीजमध्ये अॅलेक्स पॅरिश नावाच्या एफबीआय एजंटच्या भूमिकेत आहे.
- 'क्वांटिको' ही स्टोरी काही एफबीआय एजंट्सवर आधारित आहे.
- 'क्वांटिको' मध्ये प्रियांकाबरोबर डॉग्रे स्कॉट (लियाम), जेक मेकलॉघलिन (रयान), आँजनुए एलिस (मिरांडा), यास्मीन अल मस्सारी (निमाह), जोहना ब्रॅडी (शेल्बी), टॅट एलिंग्टन (साइमन) आणि ग्रॅहम रोजर्स (कालेब हास) हेही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
हॉलीवूडपट 'बेवॉच'मध्ये झळकणार..
- प्रियांका तिचा पहिला हॉलिवूडपट 'बेवॉच'मध्ये काम करत आहे. त्यात ती ड्वेन जॉनसन (द रॉक) आणि जॅक अॅफ्रान यांच्याबरोबर झळकणार आहे.
- मात्र प्रियंका या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट 26 मे 2017 रोजी रिलीज होईल.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)