आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्लिनमध्ये प्रियांका चोप्राने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करताना प्रियांका चोप्रा. - Divya Marathi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करताना प्रियांका चोप्रा.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या आगामी 'बेवॉच' या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सध्या बर्लिन येथे आहे. योगायोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील विदेश दौ-याच्या निमित्ताने बर्लिन येथेच आहेत. दरम्यान आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत नरेंद्र मोदी यांनी प्रियांकाची भेट घेतली. 
 
प्रियांकाने मोदी यांच्यासोबतच्या भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. यामध्ये नरेंद्र मोदी ब्लॅक सूटमध्ये तर प्रियांका व्हाइट ड्रेसमध्ये दिसतेय. प्रियांकाने नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीचा आनंद व्यक्त करताना लिहिले, "एवढ्या बिझी शेड्युलमधून भेटण्यासाठी वेळ काढला यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद." 

पुढील स्लाईड्सवर बघा, मोदी यांच्यासोबतच्या भेटीदरम्यानची प्रियांकाची दोन छायाचित्रे... 
बातम्या आणखी आहेत...