आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

S Durga: अॅक्ट्रेसने केला खुलासा, कॉन्ट्रोव्हर्सीमुळे मला जीवे मारण्याची धमकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी - 'एस दुर्गा' वरुन सुरु असलेल्या वादामुळे 48व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) मध्ये याचे स्क्रिनिंग होऊ शकले नाही. एवढेच नाही तर फिल्मबद्दलच्या रोषाचा थेट सामना अॅक्ट्रेस राजश्री देशपांडेला करावा लागत आहे. राजश्रीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याचा खुलासा स्वतः राजश्रीने केला आहे. केरळ हायकोर्टाने एस दुर्गा ही फिल्म  इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) मध्ये दाखवण्यात यावी असा निवाडा दिला असतानाही अजून याच्या स्क्रिनिंगबद्दलची अनिश्चितता कायम आहे.

 

काय म्हणाली अॅक्ट्रेस 
- सनल कुमार शशिधरनच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या एस दुर्गा फिल्मची अॅक्ट्रेस राजश्री म्हणाली, 'न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही IFFI मध्ये आम्ही हा चित्रपट पाहू शकलो नाही. याचे फार वाईट वाटते. आम्ही वाट पाहात आहोत की फिल्मचे स्क्रिनिंग केव्हा होणार.'
- निर्मात्यांचा आरोप आहे, 'IFFI चे डायरेक्टर सुनीत टंडन आणि  इन्फर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री जाणिवपूर्वक या फिल्मचे स्क्रिनिंग टाळत आहे. केरळ हायकोर्टाने निर्णय दिल्यानंतरही हे सुरु आहे. वास्तविक या फिल्ममध्ये वादग्रस्त असे काहीच नाही.'
- तर राजश्रीचे म्हणणे आहे, की 'दुर्गा नावाने कोणाच्या धार्मिक भावना दुखावत आहे. या देशात किती जणांचे नाव हे देवी-देवतांच्या नावावरुन आहे. त्यामुळे भावना दुखावत नाही का?'
- राजश्रीने सांगितले की तिला या फिल्ममुळे सोशल मीडियाच्या माध्यामातून जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. 
- IFFI मध्ये मराठी न्यूड आणि साऊथची एस दुर्गा या दोन चित्रपटांना ज्यूरीने मंजूरी दिल्यानंतरही केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यास परवानगी दिलेली नाही. 

बातम्या आणखी आहेत...