आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या या हिरोईनला कोर्टाने पाठवले समन्स, जाणून घ्या काय आहे यामागे कारण...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/हैदराबादः तेलगू आणि बॉलिवूड अभिनेत्री रंभाला हैदराबाद पोलिसांनी समन्स पाठवून लवकरात लवकर कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. रंभाच्या वहिनीने तिच्याविरोधात हुंडयासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी 2014 मध्ये बंजारा हिल्स पोलिस स्थानकात रंभा तिचे पालक आणि भावाविरोधात हुंडयासाठी छळ केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
 
कोर्टाच्या आदेशावरुन बंजारा हिल्स पोलिस स्टेशनमध्ये रंभाविरोधात भांदवी कलम 498 ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंभा काही काळ यूएसमध्ये होती, त्यामुळे पोलिसांनी तिला समन्स पाठवले नव्हते. मात्र अलीकडेच तिला एका टीव्ही शोच्या निमित्ताने हैदराबाद येथील आली. त्यामुळे पोलिसांनी तातडीने तिला समन्स पाठवून कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले. पल्लवी आणि श्रीनिवास यांचा 1999मध्ये विवाह झाला होता. दोघांना दोन मुले आहेत. 
 

पल्लवीने काय म्हटले होते तक्रारीत...
रंभाचा भाऊ पी.श्रीनिवास राव यांची पत्नी पल्लवीने ही तक्रार दाखल केली आहे. गेल्या काही वर्षांपासून आणखी हुंडा आणण्यासाठी आपला सतत शारीरीक आणि मानसिक छळ करण्यात येत होता असे पल्लवीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करावा यासाठी पल्लवीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या निर्देशावरुन हुंडा प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंभालाही यात आरोपी बनवण्यात आले आहे.  

पुढे वाचा, दोन मुलींची आई आहे रंभा...  
बातम्या आणखी आहेत...