आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानपेक्षा वयाने लहान आहे ही अॅक्ट्रेस, 25 वर्षांत असे बदलले हिचे आयुष्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगडः 1991 चा काळ, सिनेमा होता 'लव'... हीरो सलमान आणि हीरोईन होती रेवती. या हिट सिनेमात झळकलेल्या सलमानचे त्यावेळी वय होते 26 तर रेवती होती 25 वर्षांची... मात्र आज तब्बल 25 वर्षांनंतर चित्र अगदी उलट आहे. आता रेवती 50 वर्षांची असून गंभीर आणि चरित्र भूमिका साकारतेय, तर सलमान मात्र त्याच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या सोनम कपूर, अनुष्का शर्मा, सोनाक्षी सिन्हा या तरुण अभिनेत्रींसोबत पडद्यावर रोमान्स करतोय. असे का? चंदीगडमध्ये भास्करने रेवतीला हा प्रश्न विचारला... अभिनेत्रीने दिले हे उत्तर...

- या प्रश्नाचे उत्तर देताना रेवती म्हणाली, जापानची फिल्म इंडस्ट्री असो, ईराणची असो किंवा मग बॉलिवूड... असे प्रत्येक इंडस्ट्रीत घडते.
- एक कलाकार म्हणून मी हा ट्रेंड तोडू शकत नाही. मात्र दिग्दर्शकाच्या रुपातून नक्कीच हा ट्रेंड मोडित काढू शकते.
- रेवतीने 'लव' या सिनेमासोबतच 'मुस्कुराहट' या सिनेमातसुद्धा एका चुलबुली मुलीची भूमिका साकारली होती.
- कन्नडपासून ते मल्याळम आणि हिंदीतील अनेक सिनेमांमध्ये रेवतीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

वेगळा विचार करते रेवती...
- सेन्सॉर बोर्डविषयी रेवती म्हणते, माझ्या मते, प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पद्धत ही वेगळी असते.
- प्रत्येक व्यक्ती परफेक्ट कशी असू शकेल.
- एखादी व्यक्ती ग्रे शेडमध्येसुद्धा आपल्या समोर येऊ शकते. हा निर्णय आपण लोकांवर सोडायला हवा, त्यांना काय हवे आहे.

कोण आहे रेवती?
- कोच्चीमध्ये जन्मलेली रेवती व्यवसायाने अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि सामाजिक कार्यकर्ती आहे.
- 1986 मध्ये दिग्दर्शक सुरेश चंद्र मेननसोबत रेवतीचे लग्न झाले होते.
- 16 वर्षे सोबत राहिल्यानंतर 2002 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
- सुरेश चंद्र मेननसोबत घटस्फोट घेतल्यानंतर रेवतीने 2013 मध्ये तिने एका मुलीला दत्तक घेतले असून तिचे नाव माही आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, रेवतीचे जुने फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...