आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही अॅक्ट्रेस म्हणाली - 'रेप करणा-याला मिळायला हवी एकच शिक्षा, त्यांना नपूंसक बनवावे'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोच्चीः महिलांवर बलात्कार करणा-यांना एकच शिक्षा द्यायला हवी. त्यांना नपूंसक बनवावे, असे म्हणणे आहे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मीरा जॅसमिनचे. पेरुमबावूरमध्ये रेप आणि मर्डरची शिकार झालेल्या एका दलित तरुणीच्या आईसोबत पत्रकार परीषदेत मीराने हे वक्तव्य केले. यावेळी ती म्हणाली, बलात्कार पीडितेला न्याय मिळवण्यासाठी पर्याप्त कयदे उपलब्ध नाहीत. अशा आरोपींना नपूंसक बनवावे....
मीरा म्हणाली, बलात्कार आणि महिलांचे लैंगिक शोषण करणा-या आरोपींना नपूंसक बनवण्याची शिक्षा अमंलात आणली तर असे क्रूर काम करण्यास कुणीही धजावणार नाही.

कोण आहे मीरा जॅसमिन
34 वर्षीय मीरा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आहे. 2004 मध्ये तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावी केला आहे. 2001 पासून ती दाक्षिणात्य सिनेसृष्टीत कार्यरत आहे. मल्याळम, तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमधील सिनेमांत तिने काम केले आहे.

वादाची आहे किनार..
2008 मध्ये असोसिएशन ऑफ मल्याळम मुव्ही आर्टिस्टच्या वतीने तिच्यावर मल्याळम सिनेमांत काम करण्यावर अनऑफिशिअली बॅन करण्यात आले होते. हा निर्णय तिने 'ट्वेंटी : 20' या सिनेमाच्या शूटिंगला नकार दिल्याने घेण्यात आला होता. याशिवाय तिने तलिपरम्बाच्या राजा राजेश्वर मंदिरात जाऊन पूजा केली होती. त्यामुळे हिंदू संघटनांनी तिला विरोध दर्शवला होता. राजा राजेश्वर मंदिरात हिंदू लोकांव्यतिरिक्त कुणीही पूजा करु शकत नाही.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, मीरा जॅसमिनचे काही Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...