आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RECALL: या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने वयाच्या 60 व्या वर्षी केले होते पहिले लग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- सुहासिनी मुळे आणि त्यांचे पती अतुल गुर्टु ) - Divya Marathi
(फाइल फोटो- सुहासिनी मुळे आणि त्यांचे पती अतुल गुर्टु )
प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजीत राय यांनी 'भूवन शामा' या सिनेमातील नायिका सुहासिनी मुळे यांच्याविषयी म्हटले होते, की एक चांगली अभिनेत्री सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये नसली तरीदेखील प्रत्येक ठिकाणी तिची उपस्थिती जाणवते. 'भुवन शोमा'मध्ये गौरीची भूमिका साकारणा-या सुहासिनी मुळे यांनी एका मुलाखतीत म्हटले होते, ''एव्हरेस्ट सर करताना येणा-या अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. माझ्या आयुष्यातसुद्धा अनेक एव्हरेस्ट आले, काही पूर्ण झाले, तर काही अद्याप शिल्लक आहेत.'' पटनात जन्मलेल्या सुहासिनी मुंबईत वास्तव्याला असून गेल्या अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहेत.
वयाच्या साठाव्या वर्षी केले लग्न...
'दिल चाहता है' आणि 'लगान' या सिनेमांमध्ये झळकलेल्या आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सुहासिनी मुळे यांनी अनेक वर्षे एकटी घालवल्यानंतर वयाच्या साठाव्या वर्षी लग्न केले. 64 वर्षीय सुहासिनी 2011 मध्ये भौतिकशास्त्रज्ञ अतुल गुर्टु यांच्यासोबत विवाहबंधनात अडकल्या. अतुल गुर्टु यांच्यासोबत फेसबुकच्या माध्यमातून त्यांची मैत्री झाली होती. अतुल गुर्टु यांचे सुहासिनी यांच्यासोबत दुसरे लग्न आहे. त्यांचे पहिल्या पत्नीचे नाव प्रोमिला बावा असे होते. 2006 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांना एक मुलगासुद्धा होता. मात्र 1991 मध्ये त्याचाही मृत्यू झाला होता. लग्नाच्या वेळी सुहासिनी यांचे वय 60 तर गुर्टू यांचे वय 65 होते. विशेष म्हणजे सुहासिनी यांचे हे पहिलेच लग्न आहे.
कुटुंबाला बसला होता आश्चर्याचा धक्का
सुहासिनी यांनी जेव्हा अतुल यांच्यासोबत लग्नाचा निर्णय घेतला असल्याची बातमी आपल्या कुटुंबीयांना दिली, तेव्हा त्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता. सुहासिनी यांनी कधीच लग्नाचा विषय गांभीर्याने घेतला नव्हता. त्यामुळे त्या कधी लग्न करतील, याची आशा त्यांच्या घरच्यांनी सोडली होती. त्यामुळे वयाच्या साठाव्या वर्षी त्यांनी लग्नाचा निर्णय घेणे ही गोष्ट एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नव्हती.
16 जानेवारी 2011 रोजी अडकल्या लग्नगाठीत
सुहासिनी आणि अतुल यांनी 16 जानेवारी 2011 रोजी आर्य समाजात लग्न केले. खरं तर 1990 पर्यंत सुहासिनी एका पुरुषासोबत लिव्ह इनमध्ये असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र यात किती तथ्य होते, हे कुणालाच ठाऊक नाही.
सौंदर्याचे रहस्य...
सुहासिनी मुळे यांना त्यांच्या सौंदर्याचे रहस्य विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, मी नियमित फळे आणि सलाद खाते. नियमित डाएटमुळे स्किन ग्लो करत.
दुरदर्शन सोडले, अनेक डॉक्युमेंट्रीवर केले काम...
वयाच्या सोळाव्या वर्षी 'भुवन शोमा' या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा अभिनय केला. त्यानंतर अभिनय करण्याऐवजी कॅनडात गेल्या आणि कृषी अध्ययन करण्याचा निर्णय घेतला. अॅग्रीकल्चरमध्ये पदवीप्राप्त केल्यानंतर भारतात परतून शेतक-यांची मदत करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतात परतल्यानंतर हे काम जुळून आले नाही. मग मास कम्युनिकेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करुन दुरदर्शनवर काही दिवस काम केले. मात्र येथेही मन न रमल्यामुळे लवकरच राजीनामा दिला. त्यांनी अनेक डॉक्युमेंट्रीसुद्धा बनवल्या आहेत.
अनेक टीव्ही मालिका आणि सिनेमांमध्ये अभिनय
20 नोव्हेंबर 1950 रोजी पटना येथे जन्मलेल्या सुहासिनी यांनी 'जोधा अकबर' (2008), 'बिग ब्रदर' (2007), 'पेज 3' (2005), 'ये तेरा घर ये मेरा घर' (2001), 'लव' (1991) आणि 'भुवन शोम' (1969) यासह अनेक सिनेमांमध्ये काम केले. टीव्हीवरसुदधा 'देवों के देव...महादेव', 'विरासत', 'देश की बेटी नंदिनी' आणि 'एवरेस्ट' या मालिकांमध्ये त्या झळकल्या आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सुहासिनी मुळे यांची निवडक छायाचित्रे...