आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

14 ते 18 तास काम करायची अॅक्ट्रेस म्हणून आजी मारायची टोमणे, अशी बदलली LIFE

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आम्रपाली दुबे. - Divya Marathi
आम्रपाली दुबे.

गोरखपूर/मुंबई - आम्रपाली दुबेला नुकताच  बेस्ट अॅक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला आहे. प्रियंका चोप्रा प्रोडक्शनच्या 'बम बम बोल रहा है काशी'साठी तिला 'भोजपुरी फिल्म अवॉर्ड 2017' चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. आम्रपाली मुळची उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील रहिवासी आहे. एक काळ असा होता, जेव्हा आम्रपाली 14 ते 18 तास काम करायची आणि घरी आल्यानंतर आजी म्हणायची 'एवढे काम करते पण तुला आपल्या जिल्ह्यातही कोणी ओळखत नाही. काय फायदा एवढे काम करुन! याचे आम्रपालीला फार वाईट वाटले आणि तिने भोजपुरी फिल्मकडे मोर्चा वळवला. 

 

आजीच्या टोमण्याला, नातीने दिले असे उत्तर... 
एका मुलाखतीत आम्रपालीने सांगितले, 'मी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत होते. रोज 14 ते 18 तास काम करुन थकून घरी पोहोचायचे. तेव्हा आजी म्हणायची,'आली. तु एवढे काम करते पण त्याचा काय फायदा? तुला आपल्या जिल्ह्यातही कोणी ओळखत नाही.' आम्रपाली सांगते, की आजीचे हे बोलणे मला फार लागले. आमच्या फॅमिलीमधील मी पहिली हिरोईन होते, मात्र घरातच माझा काही सन्मान नव्हता. तो कसा मिळवता येईल याचा मी विचार करु लागले आणि भोजपुरी फिल्म करण्याचा निर्णय घेतला.
- आम्रपालीने सांगितल्यानुसार, माझे एक मित्र आहेत, संतोष शुक्ला. ते बिग बॉस शोसाठी काम करायचे. तेव्हा दिनेश लाल निरहुआ त्या शोमध्ये कंटेस्टंट होता. मी संतोषला विचारले की तु निरहुआला ओळखतो का? ते मला फिल्ममध्ये काम मिळवून देऊ शकतील का? संतोषने सांगितले की ते त्यांचा आगामी सिनेमा 'निरहुआ हिंदुस्तानी'साठी नव्या अॅक्ट्रेसचा शोध घेत आहेत.
- 'मी दुसऱ्याच दिवशी फोनवरुन त्यांच्याशी संपर्क केला आणि निरहुआ यांच्या भेटीसाठी गेले. मी माझा टीव्ही एक्सपिरियंस त्यांना सांगितला, मग स्क्रिप्टवर डिस्कशन झाले आणि माझे सलेक्शनही झाले.'
- आम्रपाली दुबेने अॅक्टिंग करिअरची सुरुवात टीव्हीवरुन केली आहे. टीव्ही सीरियल 'रहना है तेरे पलकों की छाव में' यामध्ये आम्रपाली लीड रोलमध्ये होती. 
- आम्रपालीचा पहिला भोजपुरी सिनेमा  'निरहुआ हिंदुस्तानी' 2014 मध्ये रिलीज झाला होता. 

डॉक्टर बनायचे होते.. 
- आम्रपाली मुळची गोरखपूरमधील आहे. मात्र आता तिचे कुटुंब मुंबईला शिफ्ट झाले आहे. 
- आम्रपालीचे शिक्षण मुंबईतील भवन कॉलेजमध्ये झाले. येथे तिने ग्रॅज्यूएशन केले. 
- एका मुलाखतीत आम्रपालीने सांगितले होते, 'तिला डॉक्टर बनण्याची इच्छा होती. मात्र अभ्यासात थोडी कमी पडले. मात्र मला जे चांगले करता येते त्याकडे लक्ष दिले. लुक्स चांगला होता, म्हणून टीव्ही सीरियल्ससाठी ऑडिशन देण्यास सुरुवात केली होती.'

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, आम्रपाली दुबेचे आणखी फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...