आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माधुरी दीक्षितसह या 14 अभिनेत्रींचे पती बॉलिवूडमध्ये नाहीयेत जास्त फेमस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः डावीकडे - पती डॉ. श्रीराम नेनेंसोबत अभिनेत्री माधुरी दीक्षित, उजवीकडे - पती जय मेहतासोबत अभिनेत्री जुही चावला)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने आज वयाच्या 49 व्या वर्षात पदार्पण केले आहे. 15 मे 1967 रोजी मुंबईत एका मराठी कुटुंबात माधुरीचा जन्म झाला. 'अबोध' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या माधुरीला तेजाब या सिनेमाने लोकप्रियता मिळवून दिली.
माधुरीने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले. ‘तेजाब’, ‘राम लखन’, ‘परिंदा’, ‘दिल’, ‘साजन’, ‘बेटा’, ‘खलनायक’, ‘हम आपके हैं कौन...!’, ‘दिल तो पागल है’, ‘मृत्युदंड’ आणि ‘देवदास’ हे तिचे गाजलेले निवडक सिनेमे आहेत.
माधुरी दीक्षितच्या वाढदिवसाच्या निमित्ताने Divyamarathi.com तुम्हाला बी टाऊनमधील अशा काही अभिनेत्रींविषयी सांगत आहे, ज्यांचे पती इंडस्ट्रीत फारसे प्रसिद्ध नाहीयेत. या अभिनेत्रींनी अभिनेत्याची नव्हे तर दुस-याच क्षेत्रात कार्यरत असेलल्या पुरुषाची निवड आपल्या जोडीदाराच्या रुपात केली. या यादीत स्वतः माधुरीच्या नावाचाही समावेश आहे.
माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने
डॉ. श्रीराम नेने माधुरीसोबत लग्न झाल्यानंतर प्रसिद्धीझोतात आले. 17 ऑक्टोबर 1999 रोजी माधुरी आणि श्रीराम नेने विवाहबद्ध झाले. डॉ. श्रीराम नेने हृदयविकार तज्ज्ञ आहेत.

जुही चावला आणि जय मेहता
1984 मध्ये मिस इंडिया ठरलेली जुही चावला इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 1997मध्ये जुहीने भारतीय वंशाचे ब्रिटीश बिझनेसमन जय मेहतासोबत गुपचुप लग्न करुन आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. लग्नानंतर बरेच दिवस जुहीने लग्नाची बातमी सर्वांपासून लपवून ठेवली होती. प्रेग्नेंट झाल्यानंतर जुहीने लग्न केल्याचे उघड केले होते. जय आणि जुही यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, अशाच आणखी काही अभिनेत्रींविषयी...