आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एअरलाईन स्टाफवर घसरली आदित्य नारायणची जीभ, म्हणाला \'मुंबईत गेल्यावर तुला पाहतो\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर उदित नारायणचा मुलगा आदित्य नारायणचा एका एअरलाईनच्या स्टाफला धमकी देताना आणि आक्षेपार्ह शब्दांत बोलतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या कर्मचाऱ्याशी बोलताना आदित्यने त्याला मुंबईत आल्यावर तुला पाहून घेतो अशी धमकीही दिली.

हे आहे प्रकरण.. 
- आदित्य रायपूर एअरपोर्टवर इंडिगो एअरलाईनच्या स्टाफवर ओरडत असताना हा व्हिडीओ शूट केला आहे. 
- आदित्यला परवानगीपेक्षा जास्त सामान घेऊन जाताना एअरपोर्टवर अडवण्यात आले होते, अशी माहिती मिळाली आहे. 
- यावेळी स्टाफवर आदित्य ओरडत असल्याचे दिसत आहे. कर्मचाऱ्याने आधी शिविगाळ सुरू केल्याचे आदित्य या व्हिडीओत म्हणत असल्याचे दिसत आहे. 
- या वादात आदित्यची जीभ घसरली आणि तो स्टाफ मेंबरला म्हणाला, ' कभी ना कभी तो मैं मुंबई पहुंचूंगा ही ना फिर देखता हूं. अगर तेरी चड्डी ना उतार दी तो मेरा नाम भी आदित्य नारायण नहीं.'

सिंगिंग करिअर फारसे हिट नाही 
- आदित्यचे सिंगिग करिअर बॉलिवूडमध्ये फारसे हिट ठरलेले नाही. 
- 2010 मध्ये त्याने 'शापित' चित्रपटातून अॅक्टींग डेब्यू केला पण त्याला यश आले नाही. 
- रणवीर आणि दीपिकाच्या गोलियो की रासलीला राम-लीलामध्ये त्याने गाणे गायले आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आदित्य नारायणच्या या वादाचे काही फोटो आणि अखेरच्या स्लाइडवर पाहा व्हिडीओ.. 
(व्हिडिओ सौजन्य - यू ट्यूब)
बातम्या आणखी आहेत...