आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य पांचोलीवर नाराज पत्नी आणि मुलीने सोडले घर, हैदराबादला झाल्या रवाना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगी सना, पत्नी जरीना वहाबसोबत आदित्य पंचोली - Divya Marathi
मुलगी सना, पत्नी जरीना वहाबसोबत आदित्य पंचोली
मुंबई: अलीकडेच शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमनने एका मुलाखतीत सांगितले होते, की आदित्य पांचोलीने त्याला कंगनाबाबत सावधान केले होते. त्यानंतर आदित्यची पत्नी जरीन वहाब आणि मुलगी सना आदित्यवर नाराज झाले आहेत. रिपोर्ट्सनुसार, दोघी मुंबईतील राहते घर सोडून काही दिवसांसाठी हैदराबादला गेल्या आहेत.
काय म्हणाला होता अध्ययन...
- अध्ययन सुमन म्हणाला होता, की आदित्यने मला कंगनाविषयी सावधान केले होते.
- त्याच्या सांगण्यानुसार, एक मूव्ही प्रिमिअरवेळी आदित्यने त्याला सांगितले, 'सर्कसमध्ये तुझे स्वागत आहे. ऑल द बेस्ट'
- मात्र, जेव्हा मीडियाने आदित्यला याविषयी विचारले तेव्हा त्याने मी अध्ययनला ओळखत नसल्याचे सांगितले. आदित्य म्हणाला, 'कोण आहे अध्ययन. त्याले घेऊन या रे...'
- आदित्यचे हे वक्तव्य माध्यमांत आल्यानंतर त्याने स्वत:चा बचाव सुरु केला.
- एका लीडिंग मीडिया हाऊसला त्याने सांगितले, 'मी असे कधी म्हणालो? त्याला घेऊन या रे...चा अर्थ असा, की तिथे एक व्यक्ती मी बोलत असताना तोंडावर प्रकाश टाकत होती.'
- आदित्यच्या सांगण्यानुसार, त्याच्या म्हणण्याला चुकीच्या अर्थाने समोर आणले.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, जरीन आणि सना नाराजी व्यक्त करून आदित्यला म्हणाल्या, की त्याला कंगना आणि अध्ययनच्या प्रकरणात पडायची गरजच काय होती.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आदित्यचे पत्नी आणि मुलांसोबतचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...