आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या पाकिस्तानी गायकाला मिळाली भारतात अनिश्चित कालावधीसाठी वास्तव्याची परवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्लीः बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी पाकिस्तानी गायक अदनान सामी याला भारतात राहण्याच्या परवानगीवरून वाद उफाळला होता. मात्र, आता त्याला भारतात अनिश्चित कालावधीसाठी वास्तव्य करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मानवतेच्या दृष्टीकोनातून त्याची याचिका मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत सामीबाबत लोकसभेत माहिती दिली.
13 मार्च 2001 मध्ये सामी याने एक वर्षासाठी पर्यटक व्हिसा घेऊन भारतात आला होता. तेव्हापासून तो भारतात राहत आहे. त्यानंतर नियमितपणे त्याच्या व्हिसाची मुदत वाढवण्यात येत होती. 21 मे 2010 रोजी काढलेल्या त्याच्या पाकिस्तानी पासपोर्टची मुदत 26 मे 2015 रोजी संपली. त्यामुळे त्यांनी भारत सरकारकडे विनंती अर्ज केला होता. त्याच्या भारतात राहण्यावरून राजकीय नेत्यांनी आक्षेप घेतला होता. त्याला पाकिस्तानात पाठवून देण्याची मागणी केली होती.
अदनान सामी यांचे 'कभी तो नजर मिलाओ', 'लिफ्ट करा दे' यासारखे म्युझिक व्हिडिओ 2000 च्या सुमारास विशेष गाजले होते. त्यानंतर बॉलिवूडमध्ये त्याने अनेक सिनेमांसाठी पार्श्वगायनही केले आहे. अलीकडेच तो सलमान खान स्टारर 'बजरंगी भाईजान' या सिनेमात झळकला होता.
बातम्या आणखी आहेत...