आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WATCH: 'ग्रेट ग्रॅण्ड मस्ती' अॅडल्ट फिल्मचा ट्रेलर रिलीज, सेक्सी भूत वेधते लक्ष!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बघा 'ग्रेट ग्रॅण्ड मस्ती' या अॅडल्ट फिल्मचा ट्रेलर - Divya Marathi
बघा 'ग्रेट ग्रॅण्ड मस्ती' या अॅडल्ट फिल्मचा ट्रेलर
मुंबई : 'मस्ती' सीरिजचा तिसरा अडल्ट सिनेमा 'ग्रेट ग्रॅन्ड मस्ती'चा ट्रेलर प्रदर्शित झालाय. तुम्हाला एव्हाना 'मस्ती'च्या डबल मिनिंग डॉयलॉग्जची सवय झाली असेल. यातही तुम्हाला तेच पाहायला मिळणार आहे. फरक एवढाच, की या सिनेमात 'थ्रिल' म्हणून एक 'सेक्सी भूत'ही पाहायला मिळतंय. या सिनेमात रितेश देशमुख, विवेक ऑबेरॉय आणि आफताब शिवदासानी मुख्य भूमिकेत आहेत.
विशेष म्हणजे या सिनेमात एक दोन नव्हे तर तब्बल पाच ते सहा अभिनेत्री आपल्या बोल्डनेसचा तडका लावणार आहेत. श्रद्धा दास, मिष्टी, पूजा चोप्रा आणि सोनल चौहान आणि पूजा बोस या पाच अभिनेत्री झळकणार आहेत. तर अभिनेत्री उर्वशी रौतेला सेक्सी भूताच्या रुपात ट्रेलरमध्ये लक्ष वेधून घेतेय.

ट्रेलरच्या सुरुवातील रितेश देशमुख म्हणतो, "2003 मध्ये तीन मुलांवर एका मुलीचे भूत असते, तर 2013 मध्ये तीन मुलांवर तीन मुलींचे भूत चढते, आज 2016 मध्ये एक भूत तीन मुलांचा पिच्छा पुरवणारेय."
सिनेमाचे दिग्दर्शक इंद्र कुमार असून अशोक ठकेरिया निर्माते आहेत. 'मस्ती' आणि 'मस्ती 2' ला मिळालेल्या यशानंतर निर्मात्यांनी सिनेमाचा तिसरा भाग बनवला आहे. मस्ती 2 ने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा गल्ला जमवला होता. मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे या सिनेमातील सरप्राइज पॅकेज असणारेय. येत्या 22 जुलै रोजी 'ग्रेट ग्रॅण्ड मस्ती' सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय.
पुढील स्लाईड्समध्ये बघा, 'ग्रेट ग्रॅण्ड मस्ती' या अॅडल्ट सिनेमाचे पोस्टर्स, सोबतच सलमान खानने दिलेल्या ऑन लोकेशन भेटीची छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)