आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्या-सोनालीची 90 च्या दशकातील जाहिरात, दक्षिण आफ्रिकेतही होती Craze

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रियंका चोप्रा आणि दीपिका पादुकोण सध्या जगभरातील एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये भारताचा डंका वाजवत असल्या तरी ग्लॅमरस जगात भारताला ओळख मिळवून देण्याचे श्रेय जाते ते ऐश्वर्या रायला. मग ते मिस वर्ल्डचा किताब जिंकणे असो, हॉलीवूडच्या चित्रपटात भूमिका असो किंवा कान्स सारख्या महोत्सवांतील हजेरी असो. ऐश्वर्या ही सुमारे एका दशकापेक्षा जास्त काळापासून भारताचा चेहरा बनलेली आहे.

पण हॉलीवूडमध्ये डेब्यू करण्याआधी ऐश्वर्या दक्षिण आफ्रिकेतील टीव्ही स्क्रीनवर झळकत होती हे सांगितले तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण ते खरे आहे. एवढेच नाही तर तिच्याबरोबर टिव्ही स्क्रीन शेअर करत होती आपली मराठमोठी सोनाली बेंद्रे. हो पण आम्ही एखाद्या सिनेमा किंवा मालिकेविषयी नव्हे तर जाहिरातीविषयी बोलत आहोत. राधा नावाच्या कपड्याच्या ब्रँडची ही जाहिरात होती.

भारतीय पारंपरिक वेशभुषेमध्ये नटलेल्या म्हणजेच साडी परिधान केलेली ऐश्वर्या आणि सोनाली यांचा खास इंडियन लूक आपल्याला यात पाहायला मिळतो. मुंबईत मुख्यालय आणि दक्षिण आफ्रिकेत शाखा असलेल्या या ब्रँडसाठी तयार केलेली जाहिरात खास आफ्रिकेसाठी त्याठिकाणच्या भाषेचा लेहजा लक्षात घेऊन डब करण्यात आली होती.

गेल्या आठवड्यात एका फेसबूकपेजवर पब्लिश झाल्यानंतर या जाहिरातीने 90 च्या दशकातील आठवणींना उजाळा दिला आहे. ऐश्वर्या आणि सोनालीचेही तारुण्यातील सौंदर्य या जाहिरातीतून पाहायला मिळते. आजही ही जाहिरात पाहून या ब्रँडचे कपडे खरेदी करण्यासाठी गर्दी होऊ शकेल. चला तर मग आपणही पाहुयात ही जाहिरात.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, या जाहिरातीमधील ऐश्वर्या आणि सोनालीचा 90 च्या दशकातील घायाळ करणारा लूक..अखेरच्या स्लाइडवर पाहा जाहिरातीचा व्हिडीओ...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...