आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाक कलाकारांना चार राज्यांत ‘पडदा बंदी’! महाराष्ट्र, गुजरातचा समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पाकिस्तानी कलाकारांना काम देणे चित्रपट निर्मात्यांना महागात पडत असल्याचे दिसू लागले आहे. सीओईएआय या चित्रपटगृह मालकांच्या संघटनेने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि गोव्यात पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा मोठा फटका २८ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाला बसू शकतो. करण जोहर यांच्या या चित्रपटात पाक अभिनेता फवाद खानची महत्त्वाची भूमिका आहे.
बहुतांश एक पडदा चित्रपटगृह मालक सीओईएआयचे सदस्य आहेत. संघटनेचे अध्यक्ष नितीन दातार म्हणाले की, कोणत्याही राजकीय दबावाखाली निर्णय घेतला नाही. लोकांची देशभक्तीची भावना व राष्ट्रहित लक्षात घेतले आहे. परंतु सद्यस्थितीत पाक कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित झाले तर काही संघटना तोडफोड करू शकतात, ही भीती या निर्णयामागे मानली जाते.

‘ऐ दिल है मुश्किल,’‘रईस’चे होणार भारतीयीकरण
मनसे आणि शिवसेनेने पाक कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा पवित्रा घेतल्याने करण जोहरचा ‘ऐ दिल है मुश्किल’ (पाक कलाकार फवाद खान) आणि शाहरुख खानच्या ‘रईस’ (पाक अभिनेत्री मायरा) चित्रपटापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, करण जोहर आणि रईसचा निर्माता रितेश सिधवानी यांनी पाकिस्तानी कलाकारांची भूमिका कापून टाकून त्यांच्या जागी भारतीय कलाकार घेऊन चित्रपट नव्याने चित्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.

निर्णय चुकीचा - इम्पा : इम्पाने मात्र चित्रपट न दाखवण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. पूर्ण झालेल्या चित्रपटांवर बंदी नको, अशी आमची भूमिका असल्याचे इम्पाचे अध्यक्ष टी. पी. अग्रवाल यांनी म्हटले आहे.

सरकारलाच निर्णय घेऊ द्या : ओम पुरी
कलाकारच नव्हे तर नातेवाइकांच्या भेटी व उद्योगासाठी आलेल्या पाकिस्तानींनी परत जावे, असे सरकारने म्हणावे. देशाच्या प्रमुखालाच निर्णय घेऊ द्या.
- ओम पुरी, अभिनेता

आता मल्टिप्लेक्सच्या निर्णयाची प्रतीक्षा
पाक कलाकारांचा एकही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. मल्टिप्लेक्सचालकांनी अद्याप कोणतीही भूमिका घेेतलेली दिसत नाही.
- अमेय खोपकर, मनसे नेते
बहुतांश बॉलीवूड विरोधात : अमिताभ बच्चन,अजय देवगण, अक्षयकुमार यांनी पाक कलाकारांना काम देऊ नये, असे म्हटले होते, तर ते दहशतवादी नाहीत, अशी सलमान खानची भूमिका आहे.
बातम्या आणखी आहेत...