आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतरा वर्षांच्या संसारानंतर मलायका अरोरा-खान आणि अरबाज खानचा घटस्फोट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सतरा वर्षे संसार केल्यानंतर अभिनेता अरबाज आणि मलायका अरोरा- खान यांचा बांद्रा कौटुंबिक न्यायालयाने सहमतीने शुक्रवारी घटस्फोट मंजूर केला. वैयक्तिक मतभेदानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांच्या वकिलांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. मलायका आणि अरबाज यांना १४ वर्षांचा मुलगा आहे. मुलाचा ताबा हा मलायकाकडे असेल. मात्र, अरबाजला कधीही मुलाला भेटण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे. काही महिन्यांपासून दोघांत टोकाचे मतभेद झाले. त्यानंतर मलायका मुलाला घेऊन दुसरीकडे राहत होती. दीर सलमान खान याने आयोजित केलेल्या अनेक समारंभात मलायका दिसली नव्हती. तसेच मलायका आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, दोघांनीही या वृत्ताचे खंडन केले होते
 
बातम्या आणखी आहेत...