दिग्दर्शक अभिषेक डोगराच्या ‘डॉली की डोली’ या पहिल्या चित्रपटामध्ये सोनम कपूरची प्रमुख भूमिका होती. हटके विषयावर आधारित असलेल्या या चित्रपटाला मर्यादित यशावर समाधान मानावे लागले. डोगरा सध्या
आपल्या दुसऱ्या चित्रपटावर काम करत असून यामध्ये प्रमुख भूमिकेसाठी
अर्जुन कपूरचे नाव आघाडीवर आहे.
सूत्रांनी सांगितले की, ‘डोगराच्या पहिल्या चित्रपटाचा अरबाज खान निर्माता होता. अरबाजसोबत डोगराने तीन चित्रपटांचा करार केला आहे. मात्र या दुसऱ्या चित्रपटाचा निर्माता अरबाज असणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र डोगराने अर्जुनची भेट घेत त्याला कथानक ऐकवले आहे. अर्जुनलादेखील कथा आवडली असून त्याने चित्रपटास होकार कळवला आहे.’ डोगराच्या दुसऱ्या चित्रपटाचे कथानक जरा हटके असणार आहे.
डोगराने याबाबत सांगितले की, ‘अर्जुन आणि माझी चित्रपटाच्या कथानकाबाबत चर्चा झाली. हा एक रोमांटिक कॉमेडी चित्रपट आहे.