गजेंद्र चौहान आणि ‘राधे माँ’ची भक्ती सोशल मिडीयावरून नुकतीच समोर आल्यावर आता बॉलीवूडचे शो-मॅन सुभाष घईंनी
आपली भक्ती स्वत:च जगगाहिर केलीय.
सुभाष घई सांगतात, “ मी आणि माझी पत्नी मुक्ता दोघेही वैष्णवदेवीचे भक्त आहोत. आणि म्हणूनच गेली एक वर्ष आम्ही बोरीवलीला ‘राधे माँ’च्या दर्शनाला जातो. आम्ही बोरीवलीतल्या ‘माता की चौकी’मध्ये जातो आणि ‘राधे माँ’चे आशिर्वाद घेतो. आम्ही ‘राधे माँ’चे भक्त आहोत. त्यामुळे आमच्या घरी सुध्दा एकदा आम्ही ‘माता की चौकी’चे आयोजन केले आहे. आणि ‘राधे माँ’ला बोलावून त्यांचे यथोचित आगत-स्वागतही केले आहे. ‘राधे माँ’ला आमच्याविषयी खूप ममता आहे. ती आम्हांला तिच्या आई-वडिलांसारखं प्रेम करते. आज ‘राधे माँ’विषयी खूप उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. पण आम्हाला कधीच तिच्याविषयी असे काही जाणवले नाही.”
ते पूढे सांगतात,” ‘राधे माँ’ ही वैयक्तिक जीवनात एक साधी गृहिणी आहे. जी आपल्या दोन मुलांवर आणि नातवावर जीवापाड प्रेम करते. ती इतर स्त्रींयासारखीच आपलं घर-संसार आणि मुल-बाळ यात रमणारी गृहकृत्यदक्ष स्त्री आहे, असे मला वाटते. मी तिचे देवी रूप पाहिलंय, ज्या रूपात ती आपल्या भक्तांवर माया करते. भक्तांनी तिच्यावर मुलासारखं प्रेम करावं, अशी तिची इच्छा असते. “
पुढील स्लाइडमध्ये वाचा, राधे माँच्या शॉपिंगच्या फोटोंविषयी काय सांगतायत, सुभाष घई