आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरगनने जखमी सैफवर शस्त्रक्रिया, करीना पोहोचली हॉस्पिटलमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सैफची पत्नी करीना कपूर खान त्याला पाहाण्यासाठी सोमवारी हॉस्पिटलमध्ये आली होती. - Divya Marathi
सैफची पत्नी करीना कपूर खान त्याला पाहाण्यासाठी सोमवारी हॉस्पिटलमध्ये आली होती.
मुंबई - सैफ अली खान त्याच्या होम प्रॉडक्शनच्या चित्रपटाच्या शुटिंगवेळी एअरगनच्या एका शॉटने जखमी झाला होता. छर्रा त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला लागला होता. सैफ सध्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे. सोमवारी त्याच्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्याची पत्नी करीना कपूर खान त्याच्या भेटीसाठी आली होती. आता धोका टळला असल्याचे त्याची बहिण सोहा अली खानने स्पष्ट केले आहे.

- मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना रविवारी घडली. सैफ अली खान त्याच्या होम प्रॉडक्शनच्या चित्रपटाची शुटिंग करीत होता.
- या चित्रपटाचे नाव अजून निश्चित झालेले नाही. अक्षत वर्मा या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.
- शुटिंगदरम्यान एअरगनमधी मिसफायर झाले आणि त्याचा छर्रा सैफच्या अंगठ्याला लागला.
- सैफला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर सोमवारी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्याची प्रकृती स्थिर असून लवकरच त्याला डिस्चार्ज मिळू शकतो.
करीना पोहोचली हॉस्पिटलमध्ये
- सैफची पत्नी करीना कपूर खान त्याला पाहाण्यासाठी सोमवारी हॉस्पिटलमध्ये आली होती.
- सोहाने सांगितले, की रविवारी सकाळी त्याला लागले, आता तो बरा आहे.
- याआधी एजंट विनोद चित्रपटाच्या शुटिंग दरम्यानही सैफ जखमी झाला होता.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...