आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदर कुमारनंतर आणखी एका अॅक्टरचा हार्ट अटॅकने मृत्यू, रितेशला बसला धक्का

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेंगळुरू - कन्नड अॅक्टर ध्रुव शर्मा याचा मंगळवारी हार्ट अटॅकने मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याच्या इतर अवयवांनीही काम करणे बंद केले होते. रिपोर्ट्सनुसार ध्रुवला कोणताही मोठा किंवा गंभीर आजार नव्हता. पण शनिवारी तो घरात पडला, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 35 वर्षीय ध्रुवच्या पाठिशी त्याचे आई वडील पत्नी आणि दोन मुली आहे. 28 जुलैला अॅक्टर इंदर कुमारचा हार्ट अटॅखने मृत्यू झाला होका. 

अनेक सेलिब्रिटींचे ट्वीट.. 
- ध्रुव शर्माच्या मृत्यूची बातमी येताच अनेक सेलिब्रिटींनी ट्वीटद्वारे दुःख व्यक्त केले आहे. अनेकांना याबाबत समजल्याने धक्का बसला आहे. 
- प्रियमणी, रितेश देशमुख, आफताब शिवदासानी, विक्रांत संतोष, हंसिका पुनाचा, सुमालता अशा कलाकारांनी ट्वीट केले. 
- ध्रुव शर्मा सीसीएल म्हणजे सेलिब्रिटी क्रिकेट लीगच्या कर्नाटक क्रिकेट टीम 'कर्नाटका बुलडोजर्स'चा मेंबर होता. बॅटिंगच्यासाठी तो ओळखला जायचा. 

या चित्रपटांत केले काम.. 
ध्रुवला स्नेहांजली, बेंगळुरू 560023, निनाद्रे इश्ता कानो, टिप्पाजी सर्किल सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाते. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, ध्रुवच्या मृत्यूनंतर स्टार्सने केलेले ट्वीट्स..
बातम्या आणखी आहेत...