आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधिकाचा न्यूड व्हिडिओ लीक झाल्याने अनुराग कश्यप संतापले, पोलिसांत तक्रार केली दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः अनुराग कश्यप आणि राधिका आपटे)
मुंबई : 'लय भारी', 'बदलापूर', 'हंटर' यांसारख्या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिचा न्यूड व्हिडिओ लीक झाल्याने दिग्दर्शक अनुराग कश्यप चांगलेच संतापले आहेत. राधिकाची 20 सेकंदांची एक छोटी क्लिप सध्या वॉट्स अ‍ॅप आणि इतर सोशल नेटवर्किंग साईट्सवर झपाट्याने पसरत आहे. सत्यकथेवर आधारित या शॉर्ट फिल्ममध्ये राधिकाने न्यूड सीन दिला आहे. व्हिडिओ क्लिप लीक झाल्यानंतर अनुराग यांनी थेट मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
अनुराग कश्यप यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले, ''एका सत्यकथेवर मी 20 मिनिटांची शॉर्ट फिल्म तयार केली असून ही शॉर्ट फिल्म लंडन येथे होणा-या चित्रपट महोत्सवासाठी पाठवली आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये कथेच्या मागणीनुसार राधिकाला हा बोल्ड सीन द्यायचा होता. तिने धाडस दाखवत हा सीन दिला होता. याचे चित्रीकरण असताना आम्ही फक्त महिलांनाच तिथे उपस्थित राहण्यास परवानगी दिली होती. मात्र कोणीतरी खोडसाळपणे हाच सीन लीक केला. राधिकाने माझ्यावर विश्वास दाखवत हा सीन शुट केला होता. पण दुर्दैवाने हा व्हिडिओ लीक झाल्याने राधिकाची खिल्ली उडवली जात आहे. या प्रकारासाठी मी स्वतःला जबाबदार धरत असून पोलिस आयुक्त राकेश मारियांकडेही मी तक्रार केली आहे.''
अनुराग यांनी याविषयीचे मौन सोडले आहे. मात्र राधिकाने या संपूर्ण प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
पुढे पाहा, लीक झालेल्या व्हिडिओतील राधिकाचा फोटो...