आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AIB: इरफानने उडवली रॅपर हनी सिंगची खिल्ली, 2 दिवसांत 13 लाख लोकांनी पाहिला VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- यूट्यूब चॅनलवर AIBचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रविवारी (2 ऑगस्ट) अपलोड झालेल्या या व्हिडिओला मंगळवारी (4 ऑगस्ट) संध्याकाळपर्यंत 13 लाखांपेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये-
बॉलिवूड आणि हॉलिवूड, दोन्ही इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलेला अभिनेता इरफान खान या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओ गाण्याच्या माध्यमातून पार्टी साँगवर कटाक्ष करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, रॅपर हनी सिंगची खिल्ली उडवली आहे, त्यामध्ये पार्टी ऑल नाइटच्या धरतीवर तयार करण्यात आले आहे. पार्टी साँगमध्ये दारु, तरुणी इत्यादींवर लक्ष केंद्रीत करून खिल्ली उडवली आहे. हनी सिंगचे अनेक व्हिडिओ जसे, 'चार बोतल व्होडका', 'ब्रेकअप पार्टी'सारखे गाणे याच फॉर्मेटवर बनवण्यात आले आहेत. व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे, की सिनेमामध्ये अशाप्रकारच्या गाण्यांमधून सेक्स आणि पैसे कमावण्याचा हेतू असतो.
इरफानने स्वत:चीदेखील उडवली खिल्ली-
व्हिडिओमध्ये इरफान खानने स्वत:चीदेखील खिल्ली उडवली आहे. इरफान दावा करतो, की तो कोणत्याही प्रकरचा अभिनय करू शकतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवण्यात आले, की तो एक यशस्वी अभिनेता आहे आणि त्याला हॉलिवूडच्या सर्वात प्रसिध्द दिग्दर्शकांपैकी एक क्रिस्टोफर नोलानचासुध्दा फोन येतो. व्हिडिओमध्ये असाही दावा करण्यात आला आहे, की 'मकबूल' सिनेमातील त्याच्या कामाची शेक्सपिअरने प्रशंसा केली होती. विशाल भारव्दाजच्या 'मकबूल' शेक्सपिअरच्या 'प्ले मॅकबेथ'वर आधारित आहे. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेल्या बातचीतमध्ये एआयबीची टीम म्हणते, की इरफानने कधीच पार्टी साँग केले नाहीये. यामुळे इरफान नाराज होतो आणि पार्टी साँग करून दाखवतो.
एआयबीवरसुध्दा साधला निशाणा-
या व्हिडिओमध्ये इरफानने एआयबी टीमलासुध्दा शिवीगाळ केली. तो म्हणाला, 'अर्ध्या इंडस्ट्रीला या लोकांचे तोंड पाहण्याची इच्छा नाहीये. तुम्ही माझ्याकडे आणले.' इरफानच्या इशारा रोस्टच्या त्या वादग्रस्त व्हिडिओकडे होता. त्या व्हिडिओमध्ये काम केल्याने करन जोहर, अर्जुन कपूर, रणबीर सिंहसह अनेक कलाकारांवर अश्लिलता पसरवण्याचा आरोपाखाली तक्रार दाखल करण्यात आली होती. एआयबीला तो व्हिडिओ यूट्यूबवरून काढावा लागला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बातमीच्या संबंधित फोटो...