आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Worst Time OF Stars: ऐश्वर्या-अभिषेकसह या बड्या स्टार्सकडे नाही कोणताच सिनेमा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐश्वर्या-अभिषेक - Divya Marathi
ऐश्वर्या-अभिषेक
मुंबईः अभिषेक-ऐश्वर्या, सैफ अली खान, बिपाशा बसू यासारख्या मोठ्या स्टार्सकडे सध्या कोणताच चित्रपट नाही. सध्या त्यांनी कोणताच चित्रपट साइन केलेला नाही. याशिवाय आपल्या पहिल्या चित्रपटामुळे चर्चेत असलेले दहापेक्षा अधिक कलावंतही पडद्यावरून गायब आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी...

अभिषेक आणि ऐश्वर्या
अभिषेक बच्चनचा आलेख पाहता गेल्या वर्षी आलेला त्याचा सोलो हीरो चित्रपट 'ऑल इज वेल' फ्लॉप ठरला. शाहरुख खानचा मल्टिस्टारर 'हॅपी न्यू इअर' आणि 'हाऊसफुल' मालिकेतील तिसऱ्या चित्रपटात अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांच्यामध्ये अभिषेक बच्चनने काहीच विशेष करून दाखवलेले नाही. सध्या तो प्रो-कबड्डी लीगमध्ये आपल्या संघासोबत दौरे करत आहे. ऐश्वर्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास तिचा 'जज्बा' आणि गेल्या महिन्यात आलेला 'सरबजीत' दोन्हीही अपयशी ठरले. दिवाळीला प्रदर्शित होणाऱ्या करण जोहर दिग्दर्शित चित्रपटामध्ये ऐश्वर्यादेखील आहे. या चित्रपटाची शूटिंग खूप आधी पूर्ण झालेली आहे. ऐश्वर्याने आतापर्यंत मणिरत्नम, राजीव मेनन, सुजॉय घोष यांच्यासोबत आपल्या चित्रपटांची घोषणा केलेली नाही. तथापि, काही काळापूर्वी या सर्व दिग्दर्शकांसोबत चित्रपट करणार असल्याचे स्पष्ट केले होते. आगामी काळात ती पती अभिषेकसोबत जाहिरातपटांमध्ये दिसेल.

अशाच आणखी काही स्टार्सविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
बातम्या आणखी आहेत...