Home »News» Aishwara Rai Father Krishna Raj Rai Rare Photos

ऐश्वर्याला पितृशोक, बघा वडिलांसोबतचे आठवणीतील PHOTOS

दिव्य मराठी वेब टीम | Mar 20, 2017, 13:11 PM IST

मुंबईः अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचे वडील कृष्णराज राय यांचे शनिवार दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. जानेवारी महिन्यात प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कॅन्सरमुळे त्यांची प्रकृती खालावली होती. कृष्णराज राय आर्मीत बॉयोलॉजिस्ट होते. रुग्णालयात दाखल असल्यापासून ऐश्वर्या त्यांची काळजी घेत होती.

- ऐश्वर्याच्या वडिलांचा त्यांच्या मुलांच्या टॉप क्लास एज्युकेशनवर भर होता. ऐश्वर्याला मॉडेल बनण्यासाठी त्यांनीच प्रोत्साहन दिले होते. पण त्यापूर्वी तिने तिचे शिक्षण पूर्ण करावे, असे त्यांचे म्हणणे होते.
- ऐश्वर्याच्या वडिलांनी तिच्या करिअरसाठी तिला वेळोवेळी मार्गदर्शन केले होते.
- कृष्णराज राय यांनीच ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नासाठी कुटुंबीयांची समजूत घातली होती. ऐश्वर्या अभिषेकपेक्षा वयाने दोन वर्षांनी मोठी आहे.
- कृष्णराज राय ऐश्वर्याचे सासरे अमिताभ बच्चन यांचे जवळचे मित्र होते.
- या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला दाखवतोय, ऐश्वर्याची वडिलांसोबतची आठवतील क्षण...
पुढील स्लाईड्सवर बघा वडील कृष्णराज राय यांच्यासोबतचे ऐश्वर्याचे PHOTOS...

Next Article

Recommended