आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya, Aaradhya And Vidya Balan Visit Ganpati Mandal

आराध्यासोबत ऐश्वर्याने घेतले गणपतीचे दर्शन, विद्या बालनसुध्दा दिसली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(विद्या बालन, ऐश्वर्या राय बच्चन, आराध्या बच्चन)

मुंबई- अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने मुलगी आराध्यासोबत जीएसबी सेवा मंडळमध्ये गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी ऐश्वर्या पिंक आऊटफिटमध्ये तर आराध्या ग्रीन लहंगा चोलीमध्ये स्पॉट झाली. ऐश्वर्यासोबत तिचे वडील कृष्णाराज राय आणि आई बिंद्रासुध्दा सोबत होते. आराध्याला कुशीत घेऊन ऐश्वर्याने कुटुंबीयांसोबत पूजा केली.
ऐश्वर्याशिवाय अभिनेत्री विद्या बालनसुध्दा येथे पोहोचली होती. विद्या व्हाइट अँड ग्रीन सलवार सुटमध्ये पोहोचली होती. सध्या ऐश्वर्या दिग्दर्शक संजय गुप्ताच्या 'जज्बा'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. दुसरीकडे विद्या बालन 'एक अल्बेला' या मराठी सिनेमाचे शूटिंग करत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ऐश्वर्या, आराध्या आणि विद्या बालनचे फोटो...