आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : करिश्मानंतर अशी झाली ऐश्वर्याची अभिषेकच्या आयुष्यात एन्ट्री, बघा Wedding Album

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचा आज वाढदिवस आहे. 44 वर्षीय ऐश्वर्याने महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चनबरोबर 20 एप्रिल 2007 ला लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला 10 वर्षे झाली आहेत. आता ते चार वर्षांची मुलगी आराध्याचे पालक आहेत.

करिश्माबरोबर साखरपुडा मोडला अन् अभिषेकची झाली ऐश..
ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी 'ढाई अक्षर प्रेम के' मध्ये सर्वात आधी एकत्र काम केले होते. त्यानंतर त्यांनी उमराव जानमध्येही एकत्र काम केले. त्याचवेळी दोघे जवळ आले होते. 'गुरू' चित्रपटाच्या सेटवर अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले होते, असेही सांगितले जाते.

अभिषेकचे लग्न करिश्मा कपूरबरोबर होणार होते. ऑक्टोबर 2002 मध्ये अभिषेक आणि करिश्मा यांचा साखरपुडाही झाला होता. पण जानेवारी 2003 मध्ये हा साखरपुडा मोडला होता. त्यानंतर सुमारे चार वर्षांनी अभिषेक आणि ऐश्वर्या यांचे लग्न झाले. सेहरा बांधून निघालेल्या अभिषेकला पाहण्यासाठी फॅन्सची गर्दी झाली होती. त्यानेही हाताने सेहरा बाजुला करत फॅन्सला चेहरा दाखवला होता. त्यांच्या लग्न सोहळ्याला नेते, क्रिकेटपटू, बिझनेसमॅन, आणि इतर अनेक सेलेब्सही सहभागी झाले होते.

असे केले होते प्रपोज..
एका इंटरव्ह्यूमध्ये अभिषेक म्हणाला होता की, टोरंटोमध्ये झालेल्या 'गुरू' चित्रपटाच्या प्रिमियरनंतर हॉटेलच्या बाल्कनीमध्ये उभे राहून त्याने ऐश्वर्याला प्रपोज केले होते. त्यावेळी तो फार नर्व्हस होता. अभिषेकच्या मते मी ऐश्वर्याला घाबरतच प्रपोज केले होते. पण तिने होकार द्यायला जराही वेळ घेतला नाही. तो क्षण दोघांसाठीही खास आहे.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा. ऐश्वर्या अभिषेकच्या लग्नाचा Wedding Album..
बातम्या आणखी आहेत...