आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Look How Mommy Aishwarya Adores Aaradhya While Offering Prayers At Siddhivinayak Temple!

मुलगी आराध्यासोबत ऐश्वर्या पोहोचली सिद्धीविनायकाच्या चरणी, पाहा Pics

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिद्धीविनायकाच्या मंदिरात पोहोचल्या ऐश्वर्या आणि आराध्या.. - Divya Marathi
सिद्धीविनायकाच्या मंदिरात पोहोचल्या ऐश्वर्या आणि आराध्या..
माजी जगतसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन अलीकडेच मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात पोहोचली होती. यावेळी ऐश्वर्या एकटी नव्हती तर तिची लाडकी लेक आराध्यासुद्धा बाप्पाच्या दर्शनाला तिच्यासोबत आली होती. याशिवाय ऐश्वर्याची आई वृंदा राय आणि वडील कृष्णराज रायसुद्धा दर्शनाला आले होते. यावेळी ऐश्वर्या आणि आराध्याची एक झलक बघण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी मंदिराबाहेर जमली होती. विशेष म्हणजे यावेळी चिमुकल्या आराध्याने फोटोग्राफर्सना बघून हसून छान पोझ दिल्या.
सिद्धीविनायकाचे दर्शन घेऊन या दोघी माय-लेकी आनंदी दिसल्या. आरतीत या दोघीही सहभागी झाल्या होत्या. यावेळी ऐश्वर्या अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेल्या पिंक कलरच्या सलवारसूटमध्ये नेहमीप्रमाणेच सुंदर दिसली. तर तिच्या चिमुकलीनेही यावेळी सलवारसूट परिधान केला होता. ऐश्वर्याने यावेळी आराध्याला क्षणभरही आपल्या कडेवरुन खाली ठेवले नाही. गर्दीत ती तिला सांभाळताना दिसली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सिद्धीविनायकाचे दर्शन घ्यायला पोहोचलेल्या ऐश्वर्या आणि आराध्याची खास छायाचित्रे...