आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सरबजीत'चा ट्रेलर रिलीज, दिसतेय ऐश्वर्या-रणदीप हुड्डाच्या दमदार अभिनयाची झलक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाहा 'सरबजीत'च्या ट्रेलरचा व्हिडिओ... - Divya Marathi
पाहा 'सरबजीत'च्या ट्रेलरचा व्हिडिओ...

मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'सरबजीत' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता रणदीप हुडा यांचा दमदार अभिनय बघायला मिळतोय. भावाच्या न्यायहक्कांसाठी लढणारी बहीण ऐश्वर्याने या सिनेमात जिवंत केली आहे. यामधील तिचा नॉन ग्लॅमरस लूक आणि भावाच्या हक्कासाठी प्राणपणाने लढणारी तिची दलबीर सिंगची व्यक्तिरेखा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. तर अभिनेत्री ऋचा चड्ढा सरबजीतच्या पत्नीच्या भूमिकेत दिसत आहे. विशेष म्हणजे या सिनेमासाठी रणदीप हुड्डाने आपले तब्बल 18 किलो वजन कमी केले आहे.
शेतकरी असलेला सरबजीत दारूच्या प्रभावाखाली भारत-पाकिस्तान सीमारेषा पार करतो. पाकिस्तानात त्याला भारतीय गुप्तहेर ठरविण्यात येते. २३ वर्ष पाकिस्तानी तुरुंगात असलेल्या सरबजीतला सहकैदी ठार मारतात. अशा स्वरुपाची सिनेमाची कथा आहे. 'मेरी कोम' फेम दिग्दर्शक ओमंगकुमार यांनीच सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ऐश्वर्या सरबजीतची बहिण दलबीर कौरच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा 19 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सिनेमातील ऐश्वर्या आणि रणदीप हुड्डाचा लूक...
बातम्या आणखी आहेत...