आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aishwarya Rai Bachchan 70th Independence Day Celebrations At Melbourne Federation Square

मेलबर्नमध्ये मुलीसोबत ऐश्वर्याचे ध्वजारोहण, चिमुकल्या आराध्याने दिली ध्वजाला मानवंदना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या आपल्या मुलीसोबत मेलबर्न येथे ‘आयएफएफएम 2017’ मध्ये वेस्टपॅक अवॉर्डच्या रेड कार्पेट सोहळ्यासाठी पोहोचली आहे. ऐश्वर्याने फेडरेशन स्क्वेअर येथे ध्वजारोहन केले. या कार्यक्रमावेळी ऐश्वर्या नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती. तिने पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा अनारकली ड्रेस घातला होता. त्यावर हिऱ्यांचे दागिने आणखीनच उठावदार दिसत होते. ऐश्वर्याची मुलगी आराध्याही यावेळी तिच्यासोबत होती. आराध्याने आईसारखाच पांढऱ्या रंगाचा घाघरा घातला होता. भारताचे राष्ट्रगीत सुरू झाल्यावर आराध्याने ध्वजाला मानवंदना दिली. 
 
ऐश्वर्याने या कार्यक्रमात भाषण देताना म्हटले की, ‘भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. मला इथे येऊन जो मान मिळाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. मला हा दिवस नेहमीच लक्षात राहिल.’ विशेष म्हणजे ‘आयएफएफएम २०१७’ सोहळ्यात ध्वजारोहण करणारी ऐश्वर्या ही पहिली भारतीय अभिनेत्री आहे. या सोहळ्याला ती खास पाहुणी म्हणूनही हजर होती. 
 
पाहुयात, मेलबर्नच्या फेडरेशन स्क्वेअर येथे क्लिक झालेली ऐश्वर्या आणि आराध्याची खास छायाचित्रे... 
बातम्या आणखी आहेत...