आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्वेलरीच्या जाहिरातीमुळे ऐश्वर्या वादात, 'वर्णद्वेषा'च्या आरोपांना दिले उत्तर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ऐश्वर्याच्या या छायाचित्रावरुन वाद निर्माण झाला आहे.)
मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला सध्या एका प्रसिद्ध ज्वेलरी ब्रॅण्डच्या जाहिरातीमुळे जोरदार विरोधाचा सामना करावा लागत आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून वर्णद्वेष आणि बालमजुरीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप तिच्यावर आहे. या जाहिरातीचा विरोध करणाऱ्यांमध्ये स्त्रीवादी नेत्या फराह नक्वी, एनाक्षी गांगुली, हर्ष मंदेर आणि राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्षा शांता सिन्हा यांचा समावेश आहे.
काय आहे या जाहिरातीत ?
कल्याण ज्वेलर्सच्या या जाहिरातीत एक कृष्णवर्णीय मुलगा ऐश्वर्याच्या मागे छत्री घेऊन उभा आहे, ज्याचा अनेक सामाजिक कार्यकर्ते विरोध करत आहेत. पण ऐश्वर्याच्या दाव्यानुसार कंपनीने या जाहिरातीतील फोटो बदलला आहे. कल्याण ज्वेलर्सची ही जाहिरात 17 एप्रिल रोजी वृत्तपत्रात झळकली होती. 41 वर्षीय अभिनेत्री कल्याण ज्वेलर्सची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे.

ऐश्वर्याला खुले पत्र...
स्त्रीवादी नेत्यांनी यासंदर्भात ऐश्वर्याला खुले पत्र लिहिले आहे. ही जाहिरात म्हणजे बालमजुरीला प्रोत्साहन देणे, असे त्यांचे म्हणणे आहे. पत्रात लिहिले आहे, "आम्ही या जाहिरातीच्या विचाराचा निषेध व्यक्त करतो. उत्पादन विकण्यासाठी लहान मुलांना अशाप्रकारे दाखवणाऱ्या जाहिरातीत तुम्ही विचार न करता काम केले."
ऐश्वर्यानेही दिले स्पष्टीकरण...
या वादानंतर ऐश्वर्याने प्रेस नोट काढून या पत्राचे उत्तर दिले आहे. आपल्या पत्रात ती म्हणाली, "जाहिरातीमधील या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी तुमचे आभार. पण जाहिरातीच्या अखेरच्या फोटोमध्ये बदल करण्यात आला आहे." या पत्रासह ऐश्वर्याने शूटिंगमधील एक ओरिजनल फोटोही पाठवला आहे.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, ऐश्वर्याचा ओरिजनल फोटो...