आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aishwarya Rai Bachchan To Play Dalbir Kaur In Omung Kumar’S SARBJIT

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरबजीतवर आधारित सिनेमात ऐश्वर्या, साकारणार बहीण दलबीरची भूमिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः ऐश्वर्या राय बच्चन)

मुंबईः 'जज्बा' या सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पुनरागमनाची तयारी करत असलेल्या ऐश्वर्या राय बच्चनने दोन नवीन सिनेमे साइन केले आहेत. यापैकी एक मणिरत्नमचा मल्टिस्टारर सिनेमा आहे. तर दुसरा पाकिस्तानात कैदेत राहिलेल्या सरबजीत सिंह या भारतीय नागरिकाच्या आयुष्यावर आहे. या सिनेमात ऐश्वर्या महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. स्त्रीप्रधान असलेल्या या सिनेमात ऐश्वर्या सरबजीतची बहीण दलबीर कौरची भूमिका साकारणार आहे.
दलबीर कौर यांनी आपल्या भावाच्या सुटकेसाठी मोठा लढा दिला होता. मात्र सरबजीतवर पाकिस्तानी तुरुंगात कैद्यांनी हल्ला करुन जीवे मारले.
या सिनेमाचे निर्माते संदीप सिंह यांनी कास्टिंगविषयी उघड केले आहे. त्यांनी सांगितले, ''होय ऐश्वर्या या सिनेमात दलबीर कौर सिंहची भूमिका साकारणार आहे. ऐश्वर्या या सिनेमात फिट बसते. ती आपल्या भूमिकेला योग्य न्याय देईल अशी आम्हाला आशा आहे.''
हा सिनेमा ओमंग कुमार दिग्दर्शित करणार आहेत. ओमरंग यांच्या 'मेरी कोम' या सिनेमाचे संदीप सिंह सहनिर्माते होते. याशिवाय हंसल मेहतांच्या 'अलीगढ' या सिनेमाचेही ते निर्माते आहेत.