आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IFFAA मध्‍ये ऐश्‍वर्या सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्री, या सिनेमासाठी मिळाला पुरस्‍कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ऐश्‍वर्याला नुकतेच सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्री म्‍हणून गौरविले गेले आहे.  'सरबजीत' सिनेमातील भुमिकेसाठी ऐश्‍वर्याला हा पुरस्‍कार मिळाला. इंटरनॅशनल फिल्‍म फेस्टिव्‍हल अँड अवॉर्ड ऑफ ऑस्‍ट्रेलियामध्‍ये (IFFAA) बेस्‍ट अॅक्‍ट्रेस म्‍हणून ऐश्‍वर्याला अवॉर्ड मिळाला आहे. याची माहिती ट्रेंड अॅनालिस्‍ट तरण आदर्श यांनी ट्विट द्वारे दिली. 
 
सरबजीतच्‍या बहीणीची भुमिका साकारली होती  
'सरबजीत' सिनेमामध्‍ये ऐश्‍वर्याने सरबजीतची बहीण दलबीर कौरची भूमिका साकारली होती. आपल्‍या भावाला पाकिस्‍तानमधून परत आणण्‍यासाठी दलबीरने संघर्ष केला आहे. याबद्दलची कथा सिनेमात आहे. यासाठी तिला सिस्‍टीमशीदेखील दोन हात करावे लागतात. समीक्षकांनी ऐश्‍वर्याच्‍या या भूमिकेची भरपूर स्‍तूती केली होती. ओमंग कुमार यांनी या सिनेमाचे दिग्‍दर्शन केले आहे. सिनेमात रणदीप हुड्डा, रिचा चड्डा आणि दर्शन कुमार यांच्‍यादेखील मुख्‍य भूमिका आहेत. 
 
या सिनेमात दिसणार ऐश्‍वर्या 
ऐश्‍वर्या लवकरच अनुराग कश्‍यपच्‍या सिनेमात दिसणार असल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नाही. या सिनेमात ऐश्‍वर्यासोबत अभिषेक कपूर मुख्‍य भुमिकेत असण्‍याची शक्यता आहे.
 
   
बातम्या आणखी आहेत...